Online Fraud : आपल्या देशात आता ऑनलाइन पद्धतीने आर्थिक व्यवहार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अनेक जण ऑनलाईन पद्धतीने घरी बसून लाखोंचा आर्थिक व्यवहार करताना दिसत आहे.
तर दुसरीकडे वाढत चालणाऱ्या आर्थिक व्यवहारामुळे लोकांची ऑनलाइन फसवणूक देखील मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.
हॅकर्स ऑनलाइन फसवणुकीसाठी नवनवीन पद्धती शोधताना दिसतात. कधी ते मेसेजद्वारे लिंक पाठवून तर कधी कॉल करून ओटीपी मागवून ऑनलाइन फसवणूक करताना दिसतात.मात्र आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
अलीकडेच बिहारमधून एक प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीचे बँक खाते फोन कॉल आणि ओटीपीशिवाय पूर्णपणे रिकामे झाले.
काय होतं संपूर्ण प्रकरण?
आयपीएस पंकज नैन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर केला आहे
या फसवणुकीत, फसवणूक करणाऱ्यांनी आंध्र प्रदेश लँड पोर्टलच्या वेबसाइटवरून पीडितेचे नाव, आधार कार्ड आणि बायोमेट्रिक माहिती (फिंगरप्रिंटसारखी) चोरली. यानंतर आरोपींनी बनावट अंगठ्याचा ठसा आणि आधार कार्ड वापरून पीडितेच्या बँक खात्यातून सर्व पैसे काढून घेतले.
AePS वापरले
AePS (Aadhaar Enabled Payment System) या सरकारी सेवेचा वापर करून ही फसवणूक करण्यात आली आहे. ज्या भागात बँकिंग सुविधा कमी आहेत, तेथे बँकिंग सेवा देण्यासाठी लोक त्यांच्या आधार कार्ड आणि बायोमेट्रिक माहितीचा वापर करून पैसे काढू शकतात.
तुम्ही सुरक्षित कसे राहाल?
तुमचे आधार कार्ड आणि बायोमेट्रिक माहिती कोणालाही देऊ नका.
तुम्ही तुमच्या बँक खात्यात कोणताही मोबाईल नंबर दिला असेल, तो नेहमी तुमच्याकडे ठेवा.
चुकूनही ओटीपी कोणाशीही शेअर करू नका.
तुमच्या बँक खात्यात होणाऱ्या व्यवहारांवर लक्ष ठेवा.
तुमची फसवणूक झाल्याचे तुम्हाला वाटत असेल, तर विलंब न लावता ताबडतोब बँक किंवा पोलिसांना कळवा.
तक्रार कशी करावी
तुमची फसवणूक झाल्यानंतर लगेच कारवाई व्हावी असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही घटनेच्या 24 तासांच्या आत तक्रार नोंदवा, त्यानंतर अशा परिस्थितीत पोलिस प्रभावी कारवाई करू शकतात तुमच्याशी केलेली फसवणूक तुम्हाला लगेच भेटेल.