Onion smugglers । स्मगलर्स जोमात; मोदी सरकार जोशात.. कांदा उत्पादक संकटात

Onion smugglers । मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते. पण दरवर्षीप्रमाणे कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. कांद्याचे दर कमी झाल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. अशातच आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

टोमॅटोच्या नावाखाली परदेशात कांद्याची तस्करी केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सीमा शुल्क विभागाच्या नागपूर युनिटला टोमॅटोच्या कंटेनरमध्ये 82.93 मॅट्रिक टन कांदा लपवून यूएईला पाठवला जात आहे, अशी गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई केली आहे. सीमा शुल्क विभागाच्या या कारवाईमुळे सर्वांना खूप मोठा धक्का बसला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, नाशिकच्या दोन निर्यातदारांनी टोमॅटोच्या कंटेनरमध्ये टोमॅटो पेट्यांमागे कांदा भरून UAE ला पाठवण्याची तयारी सुरु होती. त्यावेळी सीमा शुल्क विभागाच्या नागपूरच्या टीमकडून मुंबईला जाऊन कंटेनरची तपासणी केली असता कंटेनरच्या समोरच्या भागांमध्ये टोमॅटोचे बॉक्स होते, तर त्यामागे कांद्याची पोती लपवली होती.

कांद्याची तस्करी केली जात असल्याने शेतकऱ्यांना याचा खूप मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी डाळिंबाच्या बॉक्समध्ये कांदा विदेशात पाठवण्यात येत आहे, असा प्रकार समोर आला होता. डाळिंब, टोमॅटो यासह इतर फळांच्या क्रेट मधून कांदा तस्करी होत आहे. डाळिंबाच्या बॉक्स मध्ये कांदा भरून पाठविला जात असल्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

दरम्यान, बांगलादेश, दुबई यांसारख्या अनेक देशात कांदा टंचाई निर्माण होऊन तेथे कांद्याच्या भावात खूप वाढ झाली आहे. याच संधीचा फायदा घेऊन काहींनी शक्कल लढवत डाळिंबाच्या बॉक्समध्ये कांदे भरून पाठवल्याचे समोर आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Comment