Onion seeds : राज्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते. पण प्रत्येक वर्षी कांद्याला चांगला भाव मिळतोच असे नाही. तरीही शेतकरी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करतात. यंदा कांद्याचे दर चांगलेच पडले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत आले होते.
अशातच आता कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसीत केलेल्या बियाण्यांवर शेतकर्यांचा विश्वास आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या कांद्याचे फुले समर्थ आणि बसवंत 780 या वाणांना कांदा उत्पादक शेतकर्यांची चांगली पसंती असते. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली २१ मे २०२४ पासून या वाणांची विक्री केली जाणार आहे.
दरम्यान कांदा बियाणांची विक्री विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी करण्यात येणार आहे, अशी महत्त्वाची माहिती महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे प्रमूख शास्त्रज्ञ (बियाणे) डॉ. आनंद सोळंके यांनी दिली आहे. प्रत्येक वर्षी या वाणांना शेतकऱ्यांकडून चांगली मागणी असते.
महत्त्वाचे म्हणजे महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विद्यापीठातील मध्यवर्ती परिसरात बियाणे विक्री आणि मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक असलेल्या नाशिक, अहमदनगर व सातारा जिल्ह्यातील कृषि विद्यापीठाचे १) कृषि संशोधन केंद्र, निफाड, जि. नाशिक, २) कांदा, लसूण व द्राक्ष संशोधन केंद्र, पिंपळगाव बसवंत, जि. नाशिक, ३) कृषि संशोधन केंद्र, चास, जि. अहमदनगर ४) कृषि संशोधन केंद्र, बोरगांव, जि. सातारा, ५) कृषि महाविद्यालय, मालेगाव जि. नाशिक, ६) कृषि संशोन केंद्र लखमापुर, ७) कृषि विज्ञान केंद्र, धुळे, ८) कृषि महाविद्यालय, पुणे, ९) कृषि महाविद्यालय, हाळगाव ता. जामखेड जि. अहमदनगर या ठिकाणी या वाणांची विक्री सुरु केली जाणार आहे.
त्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या जिल्ह्यामध्येच कांदा बियाणे प्रति किलो रु. १५०० प्रमाणे उपलब्ध होणार असून त्याचा सर्व शेतकर्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. आनंद सोळंके यांच्याकडून करण्यात येत आहे.