Onion rate । कांदा निर्यातबंदी मागे घेतल्यानंतर आज कांद्याला किती मिळाला दर? जाणून घ्या

Onion rate । कांद्याचे उत्पादन कमी झाल्याने कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने ८ डिसेंबर रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. सरकारने कांद्यावरील ही बंदी ३१ मार्च २०२४ पर्यंत लागू केली होती. त्यामुळे शेतकरी निराश झाले होते.

तसेच सरकारने निर्यात बंदी लागू केल्यानंतर कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. सरकारने कांदा निर्यात बंदीसारखा निर्णय मागे घ्यावा यासाठी, सतत शेतकरी आंदोलन करत होते. अशातच आता कांदा उत्पादकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी मागे घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कांदा निर्यातील मंजुरी दिली असून शेतकऱ्यांना खूप आनंद झाला आहे. दरम्यान, या निर्यात बंदीची डेडलाईन ३१ मार्चपर्यंत होती. पण डेडलाईन संपण्यापूर्वी सरकारने ही बंदी मागे घेतली आहे.

कांदा निर्यातबंदी उठवली असली, तरी त्याचे नोटीफिकेशन अजून हातात पडायचे आहे. त्यातील अटी आणि शर्ती पाहूनच कांदा व्यापाराची पुढील दिशा ठरणार असल्याचे लासलगाव येथील कांदा व्यापाऱ्यांचे मत आहे. शिवजयंतीच्या सुटीनंतर कांदा बाजार सुरू झाल्यावर शेतकऱ्यांना बाजारभावात दिलासा मिळेल.

दरम्यान बाजार किती रुपयांनी वाढणार हे सांगण्यास व्यापारी प्रतिनिधींनी हतबलता दर्शविली आहे. पण प्रत्यक्ष लिलावाच्या वेळेस शेतकऱ्यांना याचा अंदाज येईल. आज पुणे बाजारसमितीत १६ हजार ७२५ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. आज कमीत कमी कांदा बाजारभाव ५०० रुपये तर सरासरी कांदा बाजारभाव १ हजार ५० रुपये असे मिळाले आहे.

Leave a Comment