Onion Rate । उत्पादकांना बसणार कांदाझटका..! भाव पाडण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांची “अशी” योजना

Onion Rate । देशासह राज्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पन्न घेतले जाते. पण महत्त्वाची बाब म्हणजे दरवर्षी कांद्याला चांगला भाव असतोच असे नाही, अनेकदा कांद्याचे दर कमालीचे पडलेले असतात. सध्या कांद्याचे दर काहीसे वाढलेले आहेत.

पण आता सरकारने कांदे, टोमॅटो आणि अन्य भाजीपाल्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘खरेदी-विक्री’ योजना आखली आहे. भाज्या खरेदी करून देशभरातील १८ हजार केंद्रांमार्फत विकल्या जाणार आहेत. यासाठी एनसीसीएफ, नाफेड, केंद्रीय भांडार व राज्य सरकारांची ही केंद्रे आहेत.

विशेष म्हणजे कांदे, टोमॅटो आणि अन्य भाजीपाल्याचे भाव नियंत्रणात किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने २७,५०० कोटी रुपयांचा ‘किमत स्थिरीकरण निधी’ (पीएसएफ) बाजूला काढून ठेवला असून येत्या २३ जुलै रोजीच्या अर्थसंकल्पात ही तरतूद ३० हजार कोटी रुपये होण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेश, दिल्ली एनसीआर आणि हरयाणा यांसह उत्तर भारतात टोमॅटोच्या दरात सध्या वाढ होऊन ते ८० रुपये किलो झाले आहेत. मुरादाबाद भागात मुसळधार पावसामुळे टोमॅटोच्या पिकाचे मोठे नुकसान झाले असल्याने ही भाववाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. बटाट्यांचा देखील भाव वाढून ४० ते ४५ रुपये किलोवर गेले आहे.

दरम्यान, लवकरच महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या तीन राज्यांत विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांत महागाईने घात करू नये, यासाठी सरकारने ही योजना आखली असून या योजनेत कांदे दुप्पट भावाने खरेदी करून सुमारे ३० रुपये किलो दराने विकण्यात येत आहेत.

Leave a Comment