Onion Rate । निर्यात बंदी मागे घेताच कांद्याच्या दरात वाढ, जाणून घ्या नवीनतम दर

Onion Rate । कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने ८ डिसेंबर रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. सरकारने कांद्यावरील ही बंदी ३१ मार्च २०२४ पर्यंत लागू केली होती. त्यामुळे शेतकरी निराश झाले होते.

तसेच सरकारने निर्यात बंदी लागू केल्यानंतर कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. सरकारने कांदा निर्यात बंदीसारखा निर्णय मागे घ्यावा यासाठी, सतत शेतकरी आंदोलन करत होते. काल सरकारने निर्यातबंदीचा निर्णय मागे घेतला आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सरकारने आता ३ लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला मान्यता दिली आहे. इतकेच नाही तर सरकारने बांगलादेशमध्ये ५० हजार टन कांदा निर्यातीलाही मान्यता दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे घसरलेले कांद्याचे दर पुन्हा वाढतील.

शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. निर्यात बंदीचा निर्णय मागे घेताच कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. आज लासलगाव बाजार समितीत कांद्याचे दर वाढले आहेत. आज बाजारसमितीत कांद्याचे दर प्रतिक्विंटल ६६१ रुपयांनी वाढले असल्याचे पाहायला मिळाले. कांद्याला २ हजार १०० रुपये बाजारभाव मिळत आहे.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत ३०० वाहनातून कांद्याची आवक होत आहे. कांद्याला जास्तीत जास्त प्रतिक्विंटल २ हजार १०१ दर मिळत आहे. तसेच कमीत कमी १ हजार रुपये दर मिळत आहे. कांद्याचा दर सरासरी १ हजार ८०० रुपये आहे. येणाऱ्या काळात कांद्याचे दर वाढतील.

दरम्यान , केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कांदा निर्यातील मंजुरी दिली असून शेतकऱ्यांना खूप आनंद झाला आहे. दरम्यान, या निर्यात बंदीची डेडलाईन ३१ मार्चपर्यंत होती. पण डेडलाईन संपण्यापूर्वी सरकारने ही बंदी मागे घेतली आहे.

Leave a Comment