Onion problem In heavy rain: पुणे (pune): सध्या जास्तीच्या पावसाचे दुष्परिणाम अवघा देश भोगत आहे. तिकडे पंजाबमध्ये (Punjab farmers) याच मुद्द्यावर शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री भगवंत मान (Chief Minister Bhagwant Mann) यांच्या घराला आंदोलनाचे ठिकाण बनवले आहे. तर, इकडे महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापऱ्यांनाही याचा झटका (onion farmers and traders have also been affected.) बसला आहे. मोठा आर्थिक फटका बसल्याने शेतकरी आणि व्यापारी आता सरकारी मदत मिळण्याकडे डोळे लावून बसले आहेत.
- Side Effects of Onion: तुम्ही जास्त कांदा खाता का? तर सावधान नाहीतर होणार..
- IMD Alert: पावसात पिकांची ‘अशी’ घ्या काळजी; क्लिक करून वाचा कृषी सल्ला
- World Food Crisis : जगाते ‘ते’ मोठे संकट टळणार ? ; रशिया-युक्रेनने केला ‘हा’ मोठा करार; जाणून घ्या..
आता हवामानाच्या अनिश्चिततेने यावेळी शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. अनेकदा कधी दुष्काळामुळे तर कधी अतिवृष्टीमुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. अर्थात महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. महाराष्ट्रातील कोपरगावमध्ये (जिल्हा अहमदनगर / Kopargaon, ahmednagar) मुसळधार पाऊस (continuous heavy rain) झाला. त्यामुळे शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. कोपरगाव तालुक्यातील टाकळी फाट्याजवळील (Takli Phata in Kopargaon taluka drowned in rain water) एक व्हिडिओ आणि फोटो सध्या वेगाने शेअर होत आहेत. तब्बल नऊ ते दहा शेडमध्ये कांदा व्यापाऱ्यांनी ठेवलेला कांदा पावसाच्या पाण्यात बुडाला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे तीन ते चार कोटी रुपयांचे नुकसान झाले. शेडमध्ये पावसाचे पाणी शिरताच आत ठेवलेले कांदे पाण्यात तरंगू लागले (Onion floating in water) आहेत.
'बळी'राजा!#अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावात साठववेला कांदा अतिवृष्टीमुळं अक्षरशः तरंगतोय. शत्रूवरही इतकी वाईट वेळ येऊ नये. जुना कांदा सडलाय, नव्या कांद्याची रोपं वाहून गेलीत. त्यामुळे आता कांद्याचे दर वाढल्यानं कुणी 'रडू' हीच अपेक्षा. @jodaniMarathi @RTAhmednagar pic.twitter.com/vPLU3duGMp
— Suraj Borawake (@s_borawake) October 20, 2022
येथे शेकडो क्विंटल कांदा वाया गेल्याने व्यापाऱ्यांनी (Onion traders) आता यासाठी राज्य सरकारकडे आर्थिक मदतीची (demanded financial help from the government) मागणी केली आहे. तसेच सरकारने तातडीने आर्थिक मदत न केल्यास व्यापारी कृषी उत्पन्न बाजार समिती बंद (close the Agricultural Produce Market Committee) पाडतील, असेही कांदा व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रत्येक कांदा व्यापाऱ्याचे 25 ते 70 लाखांचे नुकसान झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. 8 ते 10 शेडमध्ये सुमारे 3 ते 3.50 कोटी रुपयांचा कांद्याचा माल होता, तो पूर्णपणे खराब झाला आहे. पुढील 1 आठवडा बाजार बंद राहणार असल्याने कांदा व्यापाऱ्यांनी शेडमध्ये साठवून (stock in the shed) ठेवल्याने वाया गेल्याचे कांदा व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. आता या व्यावसायिकांना आत्महत्येशिवाय पर्याय नाही. अगोदरच कवडीमोल दराने विकला जात असलेला हा कांदा आता पाण्यात तरंगत आहे. तो सडून खराब होणार आहे.