Onion Price : सध्या बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे. असे असतानाही भाव (Onion Price) मात्र कमी झालेले नाहीत. आवक वाढल्यानंतरही भाव वाढले (Onion Price Increase In Market) आहेत. नगर बाजार समितीत काही दिवसांपासून कांद्याच्या दरात थोडी वाढ झाली आहे. गुरुवारी (13 ऑक्टोबर) बाजार समितीत 57 हजार 667 क्विंटल आवक झाली होती. यावेळी लिलावात प्रथम प्रतवारीच्या गावरान कांद्याला (Onion) 1900 ते 2500 रुपये प्रति क्विंटल दरम्यान भाव मिळाला. याआधी सोमवारी (10 ऑक्टोबर) कांद्याला 2200 ते 2700 रुपये दरम्यान भाव मिळाला होता. जिल्ह्यातील अन्य बाजार समित्यांमध्येही याच पद्धतीने भाव मिळत आहेत.
सध्या बाजार समितीत (Market Committee) कांद्याची आवक वाढली आहे. गुरुवारी सुद्धा हा ट्रेंड कायम असल्याचे दिसून आले. नगर जवळील नेप्ती उपबाजार समितीत तब्बल 57 हजार 667 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. यावेळी लिलावात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला (Onion) सरासरी 1900 ते 2500 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. दोन नंबर कांद्याला 1500 ते 1900 रुपये, तीन नंबर कांद्याला 800 ते 1500 रुपये आणि चार नंबर कांद्याला 200 ते 800 रूपये बाजारभाव मिळाला. मागील काही दिवसांपासून कांद्याला याच पद्धतीने भाव मिळत आहेत. सध्या कांद्याची आवक वाढली आहे. तरी देखील भाव कमी झालेले नाहीत. कांद्याला मागणी वाढली आहे.
काही दिवसांपूर्वी कांद्याची आवक घटली होती. त्यावेळी भावही कमी मिळत होते. मात्र, मान्सूनच्या (Monsoon) माघारीच्या सध्याच्या काळात कांदा आवकेत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. आजमितीस सरासरी 50 हजार क्विंटलपर्यंत आवक होत आहे. सातत्याने होत असलेला पाऊस, बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या कांद्याची टंचाई तसेच शेतकऱ्यांनी साठवणूक केलेला कांदा आणल्याने कांदा आवक वाढली आहे. तर दुसरीकडे बाजारात कांद्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे आवक वाढलेली असतानाही भाव कमी न होता वाढत असल्याचे सांगण्यात आले.
- Agriculture News: लम्पी त्वचारोगाचा धोका कधी संपणार; पशुपालकांना लागली आहे चिंता
- Onion Price : बाजार समितीत कांद्याला मिळालाय ‘इतका’ भाव; पहा, ‘या’ जिल्ह्यात काय आहे भाव
- Onion Price : आवक वाढल्यानंतरही कांद्याला मिळाला ‘हा’ भाव; पहा, ‘या’ जिल्ह्यात काय आहे भाव