Onion Price : सध्या बाजार समितीत कांद्याला बऱ्यापैकी भाव मिळत आहेत. नगर जिल्ह्यातील बाजार समित्यांचा विचार केला तर येथे एक नंबर कांद्याला (Onion Price) सरासरी 1700 ते 1800 रुपये प्रति क्विटल दरम्यान भाव मिळत आहेत. सध्या बाजार समितीत (Market Committee) कांद्याची आवक वाढली आहे. गुरुवारी (15 सप्टेंबर) सुद्धा हा ट्रेंड कायम असल्याचे दिसून आले. नगर जवळील नेप्ती उपबाजार समितीत तब्बल 51 हजार 813 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. आवक वाढल्याने भाव कमी होतील असे वाटत होते मात्र, भाव फारसे कमी झाले नाहीत. यावेळी लिलावात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला सरासरी 1300 ते 1700 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरूवारी लिलावासाठी 51 हजार 813 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. त्यात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला 1300 ते 1700 रुपये, दोन नंबर कांद्याला 900 ते 1300 रुपये, तीन नंबर कांद्याला 500 ते 900 रुपये आणि चार नंबर कांद्याला 100 ते 500 रूपये बाजारभाव मिळाला. मागील काही दिवसांपासून कांद्याला याच पद्धतीने भाव मिळत आहेत. सध्या कांद्याची आवक वाढली आहे. तरी देखील भाव कमी झालेले नाहीत. कांद्याला मागणी वाढली आहे. गुरुवारी बाजार समितीत कांद्याला सरासरी 1700 रुपयांपर्यंत भाव मिळाला. जिल्ह्यातील अन्य बाजार समित्यांमध्येही याच पद्धतीने भाव मिळत आहेत.
काही दिवसांपूर्वी कांद्याची आवक घटली होती. त्यावेळी भावही कमी मिळत होते. मात्र, मान्सूनच्या (Monsoon) आगमनानंतर कांदा आवकेत वाढ होण्यास सुरुवात झाली. आजमितीस सरासरी 40 हजार क्विंटलपर्यंत आवक होत आहे. आवक वाढली असली तरी भाव मात्र फारसे कमी झालेले नाहीत. मागील दीड महिन्यापासून नगरसह जिल्ह्यातील अन्य बाजार समित्यांत कांद्याला साधारण 1700 ते 1800 रुपयांदरम्यान भाव मिळत आहेत.