Onion Price : अहमदनगर : सध्या बाजार समितीत कांद्याला बऱ्यापैकी भाव मिळत आहेत. नगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) बाजार समित्यांचा विचार केला तर येथे कांद्याला मिळणाऱ्या भावात (Onion Price) आता वाढ झाली आहे. सरासरी 2500 ते 2900 रुपये प्रति क्विटल दरम्यान भाव मिळत आहेत. सध्या बाजार समितीत (Market Committee) कांद्याची आवक कमी जास्त होत आहे. गुरुवारी (27 ऑक्टोबर) सुद्धा हा ट्रेंड कायम असल्याचे दिसून आले. नगर जवळील नेप्ती उपबाजार समितीत तब्बल 26 हजार 242 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. यावेळी लिलावात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला (Onion) सरासरी 2300 ते 2900 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. दिवाळी सणामुळे (Diwali 2022) बाजार समितीतील लिलाव बंद होते. त्यामुळे कांदा आवक वाढेल असा अंदाज होता. प्रत्यक्षात मात्र गुरुवारी आवक जेमतेम होती. यावेळी भाव मात्र वाढल्याचे दिसून आले.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी लिलावासाठी 26 हजार 242 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. त्यात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला 2500 ते 2900 रुपये, दोन नंबर कांद्याला 1600 ते 2300 रुपये, तीन नंबर कांद्याला 800 ते 1600 रुपये आणि चार नंबर कांद्याला 200 ते 800 रूपये बाजारभाव मिळाला. मागील काही दिवसांपासून कांद्याला याच पद्धतीने भाव मिळत आहेत. सध्या कांद्याची आवक वाढली आहे. तरी देखील भाव कमी झालेले नाहीत. कांद्याला मागणी वाढली आहे. गुरुवारी बाजार समितीत कांद्याला सरासरी 2900 रुपयांपर्यंत भाव मिळाला. जिल्ह्यातील अन्य बाजार समित्यांमध्येही याच पद्धतीने भाव मिळत आहेत.
काही दिवसांपूर्वी कांद्याची आवक घटली होती. त्यावेळी भावही कमी मिळत होते. मात्र, मान्सूनच्या (Monsoon) आगमनानंतर कांदा आवकेत वाढ होण्यास सुरुवात झाली. आजमितीस सरासरी 40 हजार क्विंटलपर्यंत आवक होत आहे. आवक वाढली असली तरी भाव मात्र फारसे कमी झालेले नाहीत. मागील दीड महिन्यापासून नगरसह जिल्ह्यातील अन्य बाजार समित्यांत कांद्याला साधारण 2500 ते 2800 रुपयांदरम्यान भाव मिळत आहेत.
- Must Read : The price of onion has increased: अरेव्वा….शेतकरी काहीसा सुखावला; ‘या’ पिकामुळे नुकसान भरून निघण्याची आशा
- Onion Price : आवक वाढल्यानंतरही कांद्याला मिळाला ‘हा’ भाव, जाणून घ्या, कशामुळे वाढली आवक
- Onion problem In heavy rain: म्हणून कांदा व्यापारी आक्रमक; पहा कसा बसला कोटींवधीचा आर्थिक फटका