Onion market rate update बद्दल भाजप खासदारांचे महत्वाचे स्टेटमेंट; पहा काय येणार आहे Good News

Onion market rate update Good News: सध्या कांद्याच्या बाजारात रेटचा (Onion market rate update) वांधा झाल्याने उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारने भाव स्थिर ठेवण्याच्या नावाखाली केलेल्या निर्यातबंदीचा मोठा फटका बासल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत केंद्र सरकारमध्ये असलेल्या भाजप (BJP on Onion Rate) पक्षाला मोठा झटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. अशावेळी आता हेच सरकार कांद्याच्या बाबतीत गुड न्यूज  (Good News) देणार असल्याची बातमी येत आहे.

विखे पाटील पिता-पुत्रांनी घेतली अमित शाह यांची भेट

खासदार डॉक्टर सुजय विखे (MP Dr. Sujay Vikhe Patil) पाटील यांनी याबद्दल अहमदनगर येथे माहिती दिली आहे. ते म्हणाले की, निर्यात बंदी उठवण्यासंदर्भात आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी काही दिवसांपूर्वी वडील महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Minister Radhakrushna Vikhe) यांच्यासह त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (HM Amit Shah) यांची भेट घेतली. उत्पादकांच्या समस्या, कांद्याची आवक तसेच सर्व आकडेवारी मुद्देसूद मांडून विखे पिता-पुत्रांनी या महत्वाच्या मुद्याकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. त्यानुसार आता शहा यांनी यावर सकारात्मक निर्णय घेऊ असे सांगितले असून एका आठवड्यात केंद्र सरकार कांदा निर्यात बंदी वर धोरणात्मक निर्णय घेणार आहे. (Onion market rate update Good News)

एकूणच खासदार विखे पाटील यांनी आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना गुड न्यूज येण्याचे भाकीत केले आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाला शेतकऱ्यांच्या रोषाला (Farmer Vs BJP) सामोरे जाऊ लागू नये म्हणून आता तात्पुरत्या स्वरूपात का होईना काहीतरी निर्णय येणे अपेक्षित आहे. त्यामुळे बाजारात कांद्याचे भाव किती वाढणार हे समजण्यासाठी नेमका काय निर्णय येणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment