नाशिक : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समितीत कांदा लिलाव २४ दिवस बंद होते. आता मार्केट खुले झाल्यावर खूप मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. समितीच्या आवारावर साेमवारी एकाच दिवशी ३८ हजार २९६ क्विंटल कांद्याची लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
खरीप हंगामाच्या तयारीसाठी पैशांची गरज असल्याने शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात आणत आहेत. त्यामुळे समितीत अमावास्येसह प्रत्येक शनिवारी दिवसभर कांदा लिलाव सुरू ठेवण्याचा निर्णय मर्चंट्स असोसिएशनच्या सभासदांनी घेतला आहे. अध्यक्ष व बाजार समितीचे व्यापारी सदस्य नंदकुमार डागा यांनी याबाबत माहिती दिली आहे. सध्या कमीत कमी ८००, जास्तीत जास्त २१८० तर सरासरी १८५० रुपये प्रतिक्विंटल असे भाव या बाजार समितीत मिळत आहेत.
प्रत्येक अमावास्येला सकाळच्या सत्रात व प्रत्येक शनिवारी दिवसभर कांदा लिलाव सुरू करण्याचा सकारात्मक निर्णय घेतल्याचे शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांसह लासलगाव येथील सर्व व्यावसायिक व नागरिकांनी राजकीय गट तट विसरून “आपलं गाव, आपली बाजार समिती’ ही भावना रुजवण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन नंदकुमार डागा यांनी केले आहे.
- कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
- | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.