Onion export ban । यंदा कांदा उत्पादक शेतकरी निराश झाले आहेत. कांद्याचे दर नियंत्रणात यावे, यासाठी केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतला. पण सरकारच्या या निर्णयाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. केंद्राने कांद्याची निर्यातबंदी मागे घ्यावी यासाठी, शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलन सुरु केले.
अखेर सरकारकडून कांद्याची निर्यातबंदी मागे घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. पण शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली आहे. चुकीच्या माहितीच्या आधारे ही निर्यात बंदी झाल्या धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, “कांद्याची आकडेवारी व्यवस्थेच्या माध्यमातून चुकीची आली असल्याने कांद्याचा तुटवडा निर्माण होईल म्हणून केंद्र सरकारने निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे, असे वक्तव्य राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे. त्यामुळे चुकीच्या माहितीच्या आधारे ही निर्यात बंदी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सोमवारी कांदा निर्यातबंदी उठविल्याची चर्चा झाली असून त्या पार्श्वभूमीवर पटेल यांनी ही प्रतिक्रिया आहे, निर्यातबंदीमागील धक्कादायक वास्तव एकप्रकारे समोर आले आहे. त्यामुळे केंद्राकडे कांदा लागवड आणि उपलब्धतेची माहिती जाते, तिच्यावर पुन्हा एकदा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
खरीप हंगामात कांद्याचा पुरवठा सुरळीत असूनही निर्यातबंदीचा निर्णय घेतला असल्याने शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत आले आहेत. अल्प टिकवणक्षमता असणाऱ्या खरीप कांदा उत्पादकांची मोठी आर्थिक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.