ONGC Company : सार्वजनिक क्षेत्रातील (Public Sector) तेल विपणन कंपनी (Oil Marketing Company) ‘तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळची’ (Oil and Natural Gas Corporation) परदेशी शाखा ओएनजीसी विदेश लिमिटेड (ONGC Videshi Limited-OVL) ने रशियन प्रकल्पातील (Russian project) भागभांडवल (Share capital) विकत घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ओव्हीएलने (OVL) सुदूर पूर्वेला असलेल्या रशियाच्या सखालिन-१ (Sakhalin-1 ) तेल आणि वायू (Oil and Gas) प्रकल्पातील २० टक्के हिस्सा परत घेण्याचा प्रस्ताव दिला आहे, सूत्रांकडून ही माहिती समोर आली आहे.
या महिन्याच्या सुरुवातीलाच, रशियाचे (Russia) राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (President Vladimir Putin) यांनी सखालिन-१ चे ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या एक्सॉन मोबिल (Exxon Mobil) या अमेरिकन कंपनीची (US Company) प्रादेशिक उपकंपनी असलेल्या एक्सॉन नेफ्तेगाझसोबतचा (Exxon Neftegaz) करार संपुष्टात आणला. हा प्रकल्प आणि त्याची सर्व मालमत्ता (all assets) त्यांनी एका नवीन ऑपरेटरकडे हस्तांतरित केली आहे.
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या या निर्णयानंतर, प्रकल्पाच्या इतर माजी परदेशी भागधारकांना आता त्यांचे भागभांडवल मिळविण्यासाठी रशियन सरकारकडे (Russian Government) अर्ज करावा लागणार आहे. या भागधारकांमध्ये ओव्हीएलचा (OVL) देखील समावेश आहे.
- Business Stock News : म्हणून झाली श्री सिमेंटच्या शेअरमध्ये ४ टक्क्यांनी घसरण
- अमेरिकेचा मास्टरस्ट्रोक..! ‘त्या’ एकाच निर्णयाने पाकिस्तानला टाकलेय गोंधळात; पहा, नेमके काय घडलेय..?
- Goa Business News : म्हणून गोव्यात आता बिअर महागणार
- Business News : ही कंपनी २,५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
फेब्रुवारीमध्ये युक्रेनवर (Ukraine) आक्रमण केल्यानंतर रशियावर लादण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय निर्बंधांना (International Santions) प्रतिसाद म्हणून एक्सॉन नेफ्तेगाझने (Exxon Neftegaz) या प्रकल्पावर सक्तीचा प्रतिबंधित करार घोषित केल्यानंतर मे (May Month) महिन्यात सखालिन-१ (Salakhin-1) चे उत्पादन थांबले. तेव्हापासून ओव्हीएलला (OVL) रोखीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे, असे सूत्राने सांगितले.
ओव्हीएलकडे (OVL) १५ देशांमधील ३३ तेल आणि वायू मालमत्तेमधील भागभांडवल (Share capital) आहे, यापैकी बहुतेक ही अन्वेषण मालमत्ता (Exploration assets) आहेत. सखालिन-१ ही ओव्हीएल (OVL) च्या सर्वात जुन्या गुंतवणुकीपैकी (investors) एक आहे, जिथे त्याने बुडलेले सर्व पैसे परत मिळवले आहेत आणि लाभांशाचा आनंद लुटत आहे. सखालिन- १ हे दूर-पूर्व ऑफशोअर (offshore) रशियामधील एक मोठे तेल आणि वायू क्षेत्र आहे, जे ११४० चौरस किलोमीटरमध्ये पसरले आहे, ज्यामध्ये चायवो ( Chayvo), ओडोप्टू (Odoptu) आणि अर्कुटुनडागी (ArkutunDagi) या तीन ऑफशोअर फील्डचा (Offshore field) समावेश आहे.
युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यानंतर एक्सॉन मोबिल कॉर्पने (Exxon Mobil Corp) प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. एक्सॉन मोबिलचा सखालिन-१ तेल क्षेत्रात ३० टक्के हिस्सा होता, तर ओव्हीएलचा २० टक्के हिस्सा होता. २०२१ मध्ये या तेलक्षेत्रातून दररोज सरासरी २.२७ लाख बॅरल (Barrel) तेलाचे उत्पादन झाले. २००१ मध्ये ओव्हीएल (OVL) या प्रकल्पाचा एक भाग बनले. त्याच वेळी, एक्सॉन मोबिलने २००५ मध्ये येथून तेल उत्पादन सुरू केले.
सखालिन-१ चे जवळजवळ सर्व तेल उत्पादन रशियन मुख्य भूमीवरील खाबरोव्स्क प्रदेशात (Khabarovsk region) असलेल्या डी-कस्त्री टर्मिनलद्वारे (De-Kastri terminal) आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत (International markets) पाठवले जाते, जे पाइपलाइनद्वारे (Pipeline) सखालिन-१ शी जोडलेले आहे. निष्क्रिय पाइपलाइन पायाभूत सुविधांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी रशिया पुन्हा आगामी हिवाळ्यापूर्वी (upcoming winter) उत्पादन सुरू करण्यास उत्सुक आहे, असे सूत्रांकडून कळले आहे.