OnePlus Ace 2 Pro: बाजारात ऑगस्ट 2023 मोबाईल कंपनी OnePlus आपला नवीन स्मार्टफोन सादर करणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कंपनी ऑगस्टमध्ये OnePlus Ace 2 Pro हा स्मार्टफोन लॉन्च करु शकते. बाजारात लॉन्च झाल्यानंतर हा फोन iPhone ला टक्कर देणार असल्याचे बोलले जात आहे.
TechGoing च्या रिपोर्टनुसार OnePlus Ace 2 Pro 16GB RAM सह लॉन्च केला जाऊ शकतो. याशिवाय, फोन ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 SoC चिपसह सुसज्ज असू शकतो. हे हँडसेट Android 13 आउट-ऑफ-द-बॉक्सवर चालेल.
यापूर्वी, चीनी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म Weibo वर OnePlus Ace 2 Pro चे स्पेसिफिकेशन देखील लीक झाले होते. जिथून माहिती मिळाली की octa-core Qualcomm Snapdragon 8+ Gen 2 SoC चिप वापरली जाऊ शकते.
हँडसेटला 64-मेगापिक्सेल OmniVision OV64M प्राथमिक सेन्सर, 8-मेगापिक्सेल Sony IMX355 सेन्सरसह अल्ट्रा-वाइड कॅमेरा लेन्स आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर दिला जाऊ शकतो. OnePlus Ace 2 Pro मध्ये पॉवर बॅकअपसाठी 5,000mAh बॅटरी असू शकते, जी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. फोन 30 मिनिटांत 80% पर्यंत चार्ज होऊ शकतो.
या वर्षाच्या सुरुवातीला OnePlus Ace 2 स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च करण्यात आला होता. यात 6.74-इंचाचा FHD+ वक्र AMOLED डिस्प्ले आहे. फोन Snapdragon 8+ Gen 1 5G SoC चिप सह येतो. फोन 16GB पर्यंत रॅम आणि 5,000mAh बॅटरीसह येतो.
तथापि, OnePlus Ace 2 Pro बद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. याशिवाय, हे प्रथम फक्त चीनमध्ये लॉन्च केले जाईल.