OnePlus smartphone offer : 8,000 रुपयांनी स्वस्तात खरेदी करा 108MP कॅमेरा असणारा फोन; पहा ऑफर

OnePlus smartphone offer : तुम्ही आता खूप कमी किमतीत वनप्लसचा स्मार्टफोन खरेदी करू शकता. यामुळे तुमची हजारोंची बचत होईल. तुम्ही आता स्वस्तात OnePlus Nord CE 3 Lite 5G फोन खरेदी करू शकता.

OnePlus Nord CE 3 Lite 5G ऑफर

किमतीचा विचार केला तर फोनचा 8GB + 128GB व्हेरिएंट सध्या फ्लिपकार्टवर 16,999 रुपयांनी कमी आहे, म्हणजेच लॉन्च किंमतीपेक्षा फ्लॅट 8000 रुपये कमी असून Nord CE 3 Lite 5G 24,999 रुपयांना सादर केला आहे. तुम्ही फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक कार्डने फोन खरेदी केला तर तुम्हाला ५% कॅशबॅक मिळेल. फ्लिपकार्ट या फोनवर कोणतीही एक्सचेंज ऑफर देत नाही.

OnePlus Nord CE 3 Lite 5G ची फीचर्स

108 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला हा OnePlus चा सर्वात स्वस्त 5G फोन असून रॅम आणि स्टोरेजच्या बाबतीत बोलायचे झाले तर हे दोन कॉन्फिगरेशनमध्ये लॉन्च केले गेले होते – 8GB+128GB आणि 8GB+256GB. यासोबतच 8GB व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट मिळेल. ज्यामुळे रॅम 16GB पर्यंत वाढतो. फोनमध्ये 120 Hz रिफ्रेश रेटसह 6.72 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.

तर फोटोग्राफीसाठी, Nord CE 3 Lite 5G फोनमध्ये तीन मागील कॅमेरे दिले आहेत, ज्यात EIS सह 108-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. सेल्फीसाठी, 16-मेगापिक्सेल कॅमेरा आहे.

तर कंपनीचा हा शानदार फोन Qualcomm Snapdragon 695G प्रोसेसरने सुसज्ज आहे आणि OxygenOS वर आधारित Android 13 वर काम करेल. फोन 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 mAh बॅटरी पॅक करत असून 30 मिनिटांच्या चार्जिंगसह तो संपूर्ण दिवस टिकू शकतो, असा दावा कंपनी करते.

Leave a Comment