OnePlus Nord CE 4 : उद्या लाँच होतोय OnePlus चा सर्वात शक्तिशाली फोन, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

OnePlus Nord CE 4 : उद्या OnePlus चा नवीन स्मार्टफोन लाँच होणार आहे. हा कंपनीचा सर्वात शक्तिशाली फोन असणार आहे. कंपनी मागील अनेक दिवसांपासून या फोनवर काम करत होती. जाणून घ्या या फोनचे फीचर्स आणि किंमत.

OnePlus Nord CE 4 ची खासियत

आगामी OnePlus Nord CE 4 स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज असणार आहे. कंपनीचा हा जबरदस्त फोन दोन कलर ऑप्शनमध्ये टीज केला आहे. इतकेच नाही तर कंपनीने पुष्टी केली आहे की फोन 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येईल. याला 8GB व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट मिळेल म्हणजेच रॅम 16GB पर्यंत वाढेल. फोनचे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येईल.

या शानदार फोनमध्ये 100W SuperVOOC फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट असणार आहे. केवळ 15 मिनिटांच्या चार्जिंगने फोन संपूर्ण दिवस चालू शकतो. OnePlus ने फोनचा डिस्प्ले किती मोठा असेल याबद्दल काहीही सांगितले नाही. पण कंपनीने निश्चितपणे पुष्टी केली आहे की फोनचा डिस्प्ले 120 Hz रिफ्रेश रेट आणि फुल एचडी प्लस रिझोल्यूशनला सपोर्ट करेल. हा डिस्प्ले ॲक्वा-टच तंत्रज्ञानासह येईल.

हा नवीन फोन डार्क क्रोम आणि सेलाडॉन मार्बल या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात येईल. या फोनमध्ये 6.7-इंचाचा AMOLED, फुल एचडी प्लस डिस्प्ले असणार आहे. हा फोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येईल, ज्यात 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 8-मेगापिक्सलचा दुय्यम कॅमेरा असणार आहे. सेल्फीसाठी, फोनमध्ये 16-मेगापिक्सेल लेन्स असणार आहे.

फोनमध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5500 mAh बॅटरी असून फोन Android 14 वर आधारित OxygenOS 14 वर काम करणार आहे. टिपस्टर अभिषेक यादव यांनी सांगितले की फोनच्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये इतकी असणार आहे.

Leave a Comment