OnePlus Nord 3 : काय सांगता! 14 हजारांनी स्वस्तात खरेदी करता येणार OnePlus चा ‘हा’ फोन, पहा संपूर्ण ऑफर

OnePlus Nord 3 : Amazon ने एक शानदार ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत तुम्हाला OnePlus चा काही दिवसांपूर्वी लाँच झालेला OnePlus Nord 3 हा फोन तब्बल 14 हजारांनी स्वस्तात खरेदी करता येणार आहे.

OnePlus Nord 3 चा 8GB RAM आणि 128GB स्टोरेज प्रकार 33,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता, पण सध्या हा फोन 19,998 रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजेच, लॉन्च किंमतीपेक्षा थेट 14,001 रुपये कमी आहे. कंपनीच्या या फोनचा ग्रे कलर व्हेरिएंट या किंमतीत उपलब्ध आहे. Amazon या फोनवर बँक ऑफर देत असून फायदा घेऊन त्याची किंमत आणखी 1500 रुपयांनी कमी करता येईल. बँकेच्या ऑफरनंतर, त्याची प्रभावी किंमत 18,498 रुपये होईल.

OnePlus Nord 3 ची खासियत

OnePlus Nord 3 मध्ये 6.74-इंचाचा Fluid AMOLED पॅनेल असून याचा रीफ्रेश दर 120 Hz आहे. या फोनचा डिस्प्ले HDR10+ सपोर्टसह येतो आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 द्वारे संरक्षित आहे. कंपनीचा हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 9000 आणि Mali-G710 MC10 GPU सोबत 16GB पर्यंत RAM आणि 256GB स्टोरेजसह येतो.

फोन Android 14 वर आधारित OxygenOS वर चालत असून या फोनमध्ये 80W SUPERVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000 mAh बॅटरी आहे. फोनमध्ये अलर्ट स्लाइडरही उपलब्ध आहे. यात अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह वाय-फाय डायरेक्ट आणि ब्लूटूथ 5.2 आहे.

फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असून ज्यात 50-मेगापिक्सेल प्राथमिक लेन्स, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड सेन्सर आणि OIS सपोर्टसह 2-मेगापिक्सेलचा सेन्सर आहे. सेल्फीसाठी, स्मार्टफोनला मोठा 16-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा मिळतो. OnePlus 24 जून रोजी भारतात OnePlus Nord CE 4 Lite लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे.

हे लक्षात घ्या की 26,999 रुपयांमध्ये लॉन्च केलेला, OnePlus Nord CE 3 5G चा 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंट 18,998 रुपयांना विक्रीत खरेदी करता येत आहे. लॉन्च किंमतीपेक्षा थेट 8,001 रुपये कमी. या किंमतीत फोनचा फक्त ग्रे कलर व्हेरिएंट उपलब्ध असून फोनवर उपलब्ध असलेल्या बँक ऑफरचा लाभ घेऊन 1500 रुपयांपर्यंत सूट मिळवता येईल.

या फोनमध्ये 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 782G प्रोसेसर, 50-मेगापिक्सलचा मुख्य रिअर कॅमेरा, 16-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आणि 80W SUPERVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Leave a Comment