OnePlus Nord 3 5G । स्मार्टफोनप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. बाजारात आता OnePlus Nord 4 आल्याबरोबर Nord 3 8000 रुपयांनी स्वस्त झाला आहे. तुम्हाला तो 19,998 रुपयांना खरेदी करण्याची संधी मिळत आहे.
तुम्हाला हा फोन Jio Mart आणि Flipkart वर मोठ्या डिस्काउंटवर खरेदी करता येईल. या फोनचा 8GB रॅम आणि 128GB व्हेरिएंट Jio Mart वर 19,998 रुपयांच्या किंमतीला मिळेल. तुम्ही हा फोन फ्लिपकार्टवर 25,990 रुपयांना खरेदी करता येईल. हा फोन 33,000 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. याशिवाय 1000 रुपयांची बँक सवलत विशेष कूपन सवलत मिळेल.
OnePlus Nord 3 चे स्पेसिफिकेशन
OnePlus Nord 3 मध्ये 6.74 इंच AMOLED डिस्प्ले मिळत असून हा फोन octa-core Dimensity 9000 4nm प्रोसेसर आणि Mali-G710 10-core GPU द्वारे समर्थित आहे. Nord 3 फोनमध्ये 5000mAh बॅटरी मिळेल. जी 80W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते.
या फोनच्या मागील बाजूस ट्रिपल-कॅमेरा सेटअप असून ज्यात सोनी IMX890 सेन्सर आणि OIS सह 50MP प्राथमिक कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा समाविष्ट आहे. फ्रंट कॅमेरा f/2.4 अपर्चरसह 16MP सेंसर दिला आहे. OnePlus Nord 3 मध्ये अलर्ट स्लाइडर, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, डॉल्बी ॲटमॉस स्टीरिओ स्पीकर आणि USB टाइप-सी ऑडिओ मिळेल.
त्यामुळे आता जर तुम्ही OnePlus वरून 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि उत्तम ऑफर तसेच डिस्काउंटची वाट पाहत असाल, तर हीच योग्य वेळ आहे. लवकरात लवकर या शानदार ऑफरचा लाभ घ्या.