OnePlus Ace 3 Pro : 6100mAh बॅटरी आणि 100W चार्जिंगसह खरेदी करा OnePlus चा नवीन फोन, जाणून घ्या फीचर्स

OnePlus Ace 3 Pro : OnePlus लवकरच आपला नवीन फोन लाँच करणार आहे. 6100mAh बॅटरी आणि 100W चार्जिंगसह तुम्हाला कंपनीचा नवीन OnePlus Ace 3 Pro फोन खरेदी करता येईल.

तर त्याच वेळी, कंपनी सिल्व्हर फिनिशमध्ये त्याचे ग्लास प्रकार देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टिपस्टरने लीकमध्ये OnePlus Ace 3 Pro या फोनच्या कॅमेऱ्यासाठी मेटल मिडल फ्रेम आणि बॅक पॅनलवर मोठा गोल डेको नमूद केला असून मागील रिपोर्ट्सनुसार, फोनमध्ये दिलेला कॅमेरा मॉड्यूल OnePlus 12 आणि OnePlus 11 पेक्षा वेगळा असेल.

मिळेल स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 चिपसेट आणि 120Hz डिस्प्ले

OnePlus Ace 3 Pro या फोनमध्ये दिलेल्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, कंपनी या फोनमध्ये 6.78 इंच वक्र एज डिस्प्ले देईल. हा डिस्प्ले 1.5K रिझोल्यूशन ऑफर करेल आणि त्याचा रिफ्रेश दर 120Hz असणार आहे. कंपनीचा हा शानदार फोन 16 GB रॅम आणि 1 TB इंटरनल स्टोरेजसह तुम्हाला खरेदी करता येईल. तसेच प्रोसेसर म्हणून फोनमध्ये Snapdragon 8 Gen 3 चिपसेट दिसेल. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देण्याची शक्यता आहे.

कॅमेरा आणि 100W चार्जिंग

OnePlus च्या नवीन फोनमध्ये 50 मेगापिक्सेलच्या मुख्य लेन्ससह 8 मेगापिक्सेल आणि 2 मेगापिक्सेल कॅमेरा असण्याची शक्यता आहे. OnePlus Ace 3 Pro या फोनमध्ये दिलेला मुख्य कॅमेरा OIS म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह येईल.

तर त्याच वेळी, कंपनी सेल्फीसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देऊ शकते. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर लीकमध्ये असे सांगण्यात आले आहे की हा फोन 6100mAh बॅटरीने सुसज्ज असणार आहे. या फोनची ही बॅटरी 100 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

Leave a Comment