OnePlus 12R Offer : स्वस्तात खरेदी करा OnePlus चा ‘हा’ फोन, जाणून घ्या सवलत आणि किंमत

OnePlus 12R Offer : तुम्ही आता OnePlus चा OnePlus 12R हा फोन सर्वात कमी किमतीत खरेदी करू शकता. यामुळे तुमची हजारोंची बचत होईल. म्हणजे काही दिवसांपूर्वी कंपनीने हा फोन लाँच केला होता.

OnePlus 12R किंमत

फेब्रुवारी 2024 मध्ये, OnePlus 12R, OnePlus 12 सोबत भारतासह जागतिक बाजारपेठांमध्ये लॉन्च केला होता. लॉन्चच्या वेळी, त्याच्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 39,999 रुपये होती. तसेच 16GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 45,999 रुपये इतकी होती.

Amazon ऑफर

OnePlus 12R सध्या Amazon वर 39,998 रुपयांना लिस्ट केला आहे, पण या फोनवर 2000 रुपयांचा कूपन डिस्काउंट उपलब्ध करून दिला आहे, ज्यामुळे त्याची किंमत 37,998 रुपयांपर्यंत खाली येते. हे लक्षात ठेवा ऑफर फक्त आयर्न ग्रे कलर व्हेरियंटवर उपलब्ध आहे. या फोनवर अनेक बँक ऑफर उपलब्ध आहेत. HDFC, IDFC First, OneCard क्रेडिट कार्ड आणि BOBCARD बँक कार्डद्वारे खरेदी करून ग्राहकांना 2,000 रुपयांची सवलत मिळेल. यामुळे या फोनची प्रभावी किंमत 35,998 रुपये इतकी होते. तुम्हाला फोन लॉन्च किंमतीपेक्षा 4,000 रुपयांनी कमी किंमतीत Amazon वरून खरेदी करता येईल.

फ्लिपकार्ट ऑफर

OnePlus 12R चे 8GB रॅम मॉडेल फ्लिपकार्टवर केवळ 36,150 रुपयांना खरेदी करता येईल. ऑफर ब्लू कलर व्हेरिएंटवर उपलब्ध आहे. HDFC बँक डेबिट कार्ड EMI व्यवहाराद्वारे खरेदीवर 1500 रुपयांची सवलत मिळेल. तर या फोनची प्रभावी किंमत 34,650 रुपये होईल. याचा अर्थ फ्लिपकार्ट वरून लॉन्च किंमतीपेक्षा 5,349 रुपयांनी कमी किंमतीत खरेदी करता येऊ शकतो.

Leave a Comment