OnePlus 12 : प्रथमच ‘इतक्या’ स्वस्तात मिळतोय OnePlus 12, पहा संपूर्ण ऑफर

OnePlus 12 : तुम्ही आता OnePlus 12 हा फोन खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. ज्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकते. पण तुम्हाला लवकरात लवकर या सेलचा लाभ घ्यावा लागणार आहे. पहा संपूर्ण ऑफर.

OnePlus 12 वर मिळत आहे ऑफर

OnePlus 12 हा फोन भारतात सिल्की ब्लॅक आणि फ्लोई एमराल्ड अशा दोन रंग पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. किमतीचा विचार केला तर लॉन्चच्या वेळी, त्याच्या 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 64,999 रुपये इतकी होती. तर 16GB + 512GB व्हेरिएंटची किंमत 69,999 रुपये इतकी होती.

आता, सिल्की ब्लॅक कलरमधील 12GB + 256GB मॉडेल फ्लिपकार्टवर 63,079 रुपयांना उपलब्ध असून फ्लोई एमराल्ड कलरमधील तोच प्रकार 64,069 रुपयांना खरेदी करता येईल. तर सिल्की ब्लॅक कलरमधील 16GB + 512GB व्हेरिएंट 68,239 रुपयांना खरेदी करता येईल. फ्लोई एमराल्ड कलरमध्ये तोच प्रकार 69,289 रुपयांना खरेदी करता येईल.

पण तुम्ही HSBC आणि Citibank क्रेडिट कार्डसह अतिरिक्त 10 टक्के सूट घेऊ शकतात. त्यांना ICICI बँक RuPay क्रेडिट कार्डसह 10 टक्के सवलत मिळेल. पण सध्या फ्लिपकार्ट ॲपवर एक्सचेंजचा पर्याय उपलब्ध नाही.

जाणून घ्या फीचर्स

OnePlus 12 फोन Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज असून तो Adreno 750 GPU सह जोडला आहे. रॅम आणि स्टोरेजनुसार, हा फोन 12GB+256GB आणि 16GB+512GB अशा दोन प्रकारांमध्ये येतो. फोनमध्ये 6.82-इंचाचा क्वाड एचडी प्लस (1440×3168 पिक्सेल) रिझोल्यूशन असणारा LTPO 4.0 AMOLED डिस्प्ले 4500 nits पीक ब्राइटनेस, 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि गोरिल्ला ग्लास विक्टस संरक्षण दिले आहे.

इतकेच नाही तर या फोनमध्ये Hasselblad द्वारे ट्यून केलेला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 50-मेगापिक्सेल प्राथमिक लेन्स, 64-मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्स आणि 48-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स दिली आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, यात 32-मेगापिक्सेल लेन्स असून या फोनमध्ये 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5400 mAh बॅटरी दिली आहे. कंपनीच्या या फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 7, ब्लूटूथ 5.4, GPS आणि NFC साठी समर्थन आहे.

Leave a Comment