OnePlus 12 : आता तुम्ही OnePlus 12 हा फोन खूप मोठ्या सवलतीत खरेदी करू शकता. यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकते. OnePlus च्या या शानदार फोनमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
सध्या OnePlus कम्युनिटी सेल असून या सेलमध्ये कंपनीचे अनेक फोन स्वस्तात खरेदी करता येतील. OnePlus 12 वर आतापर्यंतची सर्वात मोठी सवलत कंपनीच्या वेबसाइट किंवा Amazon ऐवजी Flipkart वर उपलब्ध आहे. तसेच अनेक विक्रेते फ्लिपकार्टवर हा फ्लॅगशिप फोन विकत असून सवलत मर्यादित काळासाठीच देण्यात येत आहे.
OnePlus 12 वर मिळेल मोठी सवलत
तुम्ही फ्लिपकार्टवर OnePlus 12 फोन DirectFromBrand ने फक्त 56,649 रुपयांना लिस्ट केला आहे. जर ग्राहकांनी Flipkart Axis क्रेडिट कार्ड कॅशबॅक ऑफरचा लाभ घेतल्यास त्यांना फक्त 53,821 रुपये द्यावे लागतील आणि 2,833 रुपयांची अतिरिक्त बचत होऊ शकेल.
ग्राहकांना इतर निवडक बँक कार्डसह पेमेंट करताना सवलत घेता येईल आणि फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक कार्ड ऑफरसह, एकूण 11,178 रुपयांची मोठी सवलत उपलब्ध आहे. OnePlus फ्लॅगशिप फोनवर मिळालेली ही सर्वात मोठी ऑफर आहे.
जाणून घ्या फीचर्स
कंपनीच्या फोनमध्ये 6.82-इंचाचा 2K डिस्प्ले दिला आहे आणि 120Hz रिफ्रेश रेट दिला आहे. फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरसह उत्कृष्ट कार्यप्रदर्शन मिळवत असून मागच्या पॅनलवर, OIS सह 50MP Sony LYT-808 प्राथमिक लेन्स, 64MP 3X पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स आणि 48MP अल्ट्रा-वाइड लेन्ससह तिहेरी कॅमेरा सेटअप दिला आहे.
OnePlus च्या या शानदार फोनमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा दिला आहे आणि Android 14 वर आधारित सॉफ्टवेअर स्किन उपलब्ध करून दिली आहे. IP65 रेटिंग असलेल्या या फोनच्या 5400mAh बॅटरीमध्ये 100W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग, 10W रिव्हर्स वायरलेस चार्जिंगसाठी समर्थन आहे.