OnePlus 12 5G । तुम्ही आता 65 हजार रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच झालेला हा फोन खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. अशी धमाकेदार ऑफर Amazon ने आणली आहे. तुम्ही हजारोंची बचत करू शकता. पहा संपूर्ण ऑफर.
OnePlus 12 रॅम आणि स्टोरेजनुसार दोन भिन्न प्रकारांमध्ये लॉन्च केला आहे. किमतीचा विचार केला तर लॉन्चच्या वेळी, त्याच्या 12GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 64,999 रुपये होती आणि 16GB RAM + 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 69,999 रुपये इतकी होती. तर त्यावेळी फ्लॉई एमराल्ड आणि सिल्की ब्लॅक कलरमध्ये हे लॉन्च केले होते. नुकतेच कंपनीने ग्लेशियल व्हाइट कलर पर्याय लॉन्च केला असून जो फक्त 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजमध्ये येतो आणि त्याची किंमत 64,999 रुपये इतकी आहे.
Amazon सेलमध्ये, फोनचा 12GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट फक्त 59,999 रुपयांना खरेदी करता येईल. विशेष म्हणजे Amazon या फोनवर बँक ऑफर्सही देत आहे. SBI किंवा ICICI कडून खरेदी करणाऱ्या प्राइम ग्राहकांना 6,205 रुपयांपर्यंतची स्वतंत्र सवलत देखील मिळत आहे, ज्यामुळे फोनची प्रभावी किंमत 53,749 रुपये झाली आहे. म्हणजेच लाँचच्या किंमतीपेक्षा 10,000 रुपयांनी कमी किंमतीत ते थेट खरेदी करता येईल. हे लक्षात घ्या की Amazon फोनवर 56,050 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील देत आहे.
त्याशिवाय अधिकृत साइटवरही फोन डिस्काउंटसह उपलब्ध आहे. फोनवर ICICI आणि Onecard बँक कार्डद्वारे खरेदी करून तुम्हाला 7000 रुपयांची सूट मिळेल. निवडलेल्या मॉडेलच्या एक्सचेंजवर 12,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस उपलब्ध आहे.