OnePlus 11R 5G : बाजारात OnePlus च्या स्मार्टफोनला चांगली मागणी असते. मागणी असल्याने OnePlus चे स्मार्टफोन खूप महाग विकले जातात. पण आता तुम्ही हेच फोन खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. आता कंपनीच्या OnePlus 11R 5G या फोनवर चांगली ऑफर मिळत आहे.
जाणून घ्या OnePlus 11R 5G वर मिळणारी ऑफर
किमतीचा विचार केला तर OnePlus 11R 5G Amazon वर Rs 6000 कमी किमतीत उपलब्ध आहे. हे लक्षात घ्या की कंपनीने हा फोन 39,999 रुपयांना लॉन्च केला आहे. पण तुम्हाला आता हा फोन Amazon सेलमध्ये 35,999 रुपयांना खरेदी करता येईल. इतकेच नाही तर बँक डिस्काउंटसह, तुम्हाला फोन अगदी कमी किमतीत खरेदी करता येईल.
समजा तुमच्याकडे ICICI बँक कार्ड असेल तर तुम्हाला 1000 रुपयांची झटपट सवलत देखील मिळू शकते. तसेच ई-कॉमर्स कंपनी फोनवर एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये 27,500 रुपयांची सवलत उपलब्ध करून दिली आहे. तथापि, तुमच्या जुन्या फोनची किंमत त्याची स्थिती आणि मॉडेलवर अवलंबून आहे, हे लक्षात ठेवा.
जाणून घ्या तपशील आणि वैशिष्ट्ये
OnePlus 11R 5G फोनमध्ये 6.74-इंच फुल एचडी प्लस वक्र AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. Qualcomm चा Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर फोनमध्ये देण्यात आला आहे. इतकेच नाही तर या फोनमध्ये सुरक्षेसाठी फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देखील दिला आहे.
याच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, OnePlus 11R मध्ये 50 मेगापिक्सलचा Sony IMX890 सेन्सर असणारा प्राथमिक कॅमेरा देण्यात आला आहे. तर त्याचा दुय्यम कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा आणि तिसरा कॅमेरा २ मेगापिक्सल्सचा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 16-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. OnePlus 11R मध्ये 5000mAh बॅटरी असून ती 100W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.