OnePlus 11 5G : बाजारात आता OnePlus चे स्मार्टफोन लाँच होऊ लागले आहेत. कंपनी आपल्या फोनमध्ये जबरदस्त फीचर्स देत आहे. पण मागणी जास्त असल्याने कंपनीचे फोन खूप महाग असतात.
पण तुम्ही आता OnePlus 11 5G हा फोन स्वस्त खरेदी करू शकता. amazon वर ही सेल सुरु आहे. या फोनची किंमत 56,998 रुपये आहे पण सवलतींमुळे तुम्ही तो स्वस्तात खरेदी करू शकता.
फीचर्स
या फोनमध्ये 3216×1440 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7-इंचाचा AMOLED QHD+ डिस्प्ले देत असून या फोनचा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करत आहे. फोनच्या डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस दिला असून फोन 8 GB LPDDR5x रॅम आणि 128 GB UFS 3.1 स्टोरेजने सुसज्ज आहे. तसेच प्रोसेसर म्हणून फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 चिपसेट मिळेल. इतकेच नाही तर फोटोग्राफीसाठी कंपनी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देत आहे.
फोनमध्ये 50-मेगापिक्सेलच्या मुख्य लेन्ससह 48-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड आणि 32-मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्स दिली आहे. तर फोनमध्ये सेल्फीसाठी, तुम्हाला या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळेल. इतकेच नाही तर फोनचा मुख्य कॅमेरा OIS आणि सेल्फी कॅमेरा EIS फीचर्ससह येतो.
फोनमध्ये दिलेली बॅटरी 5000mAh दिली आहे. ही बॅटरी 100 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज हा फोन Android 13 वर आधारित ऑक्सिजन ओएसवर काम करेल. वनप्लसचा हा फोन टायटन ब्लॅक आणि इटरनल ग्रीन या दोन रंगांच्या पर्यायांत खरेदी करता येईल.