दिल्ली : युक्रेनच्या संकटाबद्दल गंभीर इशारा देताना संयुक्त राष्ट्राचे (United Nations) महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी म्हटले आहे, की जगातील कोट्यावधी लोक उपासमारीच्या मार्गावर आहे. ते म्हणाले, की युक्रेनच्या संकटामुळे 1.7 अब्जाहून अधिक लोक गरिबी आणि उपासमारीच्या संकटात सापडण्याची शक्यता आहे. गुटेरेस यांनी एका मुलाखतीत हा इशारा दिला.
गहू आणि बार्लीच्या जागतिक उत्पादनात युक्रेन आणि रशियाचा वाटा 30 टक्के आहे. सूर्यफूल तेलाच्या (Sunflower Oil) अर्ध्याहून अधिक तेल या दोन देशांमधून येते. ही आकडेवारी लक्षात घेऊन, संयुक्त राष्ट्र प्रमुख गुटेरेस म्हणाले की, 45 कमी विकसित देश रशिया (Russia) आणि युक्रेनमधून (Ukraine) त्यांच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त गहू (Wheat) आयात करतात. युक्रेनचे संकट धान्य निर्यात थांबवत आहे आणि पुरवठा साखळी विस्कळीत करत आहे, ज्यामुळे किंमती प्रचंड वाढल्या (Inflation) आहेत.
2022 च्या सुरुवातीपासून, गहू आणि मक्याच्या किमती 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत, ब्रेंट क्रूड तेलाच्या (Crude Oil) किमती 60 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत, तर गॅस आणि खतांच्या किमती दुप्पट झाल्या आहेत. गुटेरेस यांनी जागतिक सुधारणांचे आवाहन केले ज्यामुळे जगाची आर्थिक व्यवस्था बदलेल. ते म्हणाले की सध्याची व्यवस्था “श्रीमंतांना श्रीमंत आणि गरीबांना गरीब बनवते.”
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी गुरुवारी सांगितले की युक्रेन संघर्षामुळे यावर्षी 143 अर्थव्यवस्थांचा (Economy) अंदाज कमी होईल, जे एकत्रितपणे जगाच्या जीडीपीच्या 86 टक्के आहेत. IMF, जागतिक बँक, जागतिक अन्न कार्यक्रम (World Food Programme) आणि जागतिक व्यापार संघटना (World Trade Organisation) प्रमुखांनी बुधवारी एक संयुक्त निवेदन जारी करून युक्रेनच्या संकटादरम्यान अन्न सुरक्षेसाठी त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले.
रशिया-यु्क्रेन युद्धाचा भारताला मिळतोय फायदा; ‘या’ देशाने भारताबाबत घेतलाय मोठा निर्णय..