पुणे : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचे परीक्षा अर्ज भरण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ दिलीय. दहावीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने शाळा भरत असून, बोर्डाने हे अर्ज भरण्यासाठा शाळांना मुदतवाढ दिली आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या परिपत्रकानुसार, आता शाळांना नियमित शुल्कांसह 26 डिसेंबरपर्यंत परीक्षा अर्ज भरता येणार आहेत, तर विलंब शुल्कासह 1 जानेवारीपर्यंत परीक्षेचा अर्ज भरता येणार आहेत. यापूर्वी नियमित शुल्कासह 20 डिसेंबरपर्यंत, तर विलंब शुल्कासह 28 डिसेंबरपर्यंत परीक्षा अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. मात्र, आता त्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.. त्यानुसार शाळांना विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत..
परीक्षांच्या तारखा जाहीर
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बोर्डाने दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या होत्या. त्यानुसार बारावीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिलदरम्यान होणार आहे.. तर दहावीच्या परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिलदरम्यान पार पडणार आहे. 14 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत बारावीच्या तोंडी परीक्षा, तर 25 फेब्रुवारी ते 14 मार्च दरम्यान दहावीच्या तोंडी परीक्षा होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती..
यंदा परीक्षा कशी होणार..?
सध्या राज्यात कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटने धुमाकूळ घातला आहे.. देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यामुळे राज्य सरकारही सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही नियमही लागू केले आहेत. मात्र, त्यामुळे यंदा या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार का, असा सवाल उपस्थित होत होता. मात्र, शिक्षणमंत्री गायकवाड यांनी यंदाच्या दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असून, विद्यार्थी-पालकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सांगितले आहे.
आजची रेसिपी : नाश्त्यासाठी असे तयार करा टेस्टी कांदे पोहे; ही घ्या, अगदी सोपी रेसिपी
महागाईच्या दिवसात खुशखबर..! खाद्यतेल होणार स्वस्त; पहा, केंद्र सरकारने कोणता निर्णय घेतलाय