मुंबई- भारताची स्टार शटलर आणि दोन वेळची ऑलिम्पिक चॅम्पियन पीव्ही सिंधूने (Olympic champion PV Sindhu) सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत (Syed Modi International Badminton Tournament) महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. तिने अंतिम फेरीत भारताची युवा शटलर मालविका बनसोडचा (Malvika Bansod) पराभव केला.
रविवारी लखनौ येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात सिंधूने सलग गेममध्ये मालविकोचा 21-13, 21-16 असा पराभव केला. अव्वल मानांकित सिंधूचे हे दुसरे सय्यद मोदी BWF वर्ल्ड टूर सुपर 300 स्पर्धेचे विजेतेपद आहे. यापूर्वी त्याने 2017 मध्ये हे विजेतेपद पटकावले होते.
सय्यद मोदी इंटरनॅशनलमध्ये महिला एकेरीत सर्वाधिक जेतेपदे जिंकण्याचा विक्रम सायना नेहवालच्या नावावर आहे. सायनाने 2009, 2014 आणि 2015 मध्ये विजेतेपद पटकावले होते. त्याचवेळी चेतन आनंद (2009), पारुपल्ली कश्यप (2015), किदाम्बी श्रीकांत (2016) आणि समीर वर्मा (2017, 2018) यांनी पुरुषांमध्ये एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे.
तर दुसरीकडे मिश्र दुहेरीत भारताच्या ईशान भटनागर आणि तनिषा क्रास्टो या जोडीने विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत त्यांनी टी हेमा नागेंद्र आणि श्रीवेद या जोडीचा 21-16, 21-12 असा पराभव केला.
पुरुष एकेरीचा सामना होऊ शकला नाही
कोरोनामुळे पुरुष एकेरीचा सामना होऊ शकला नाही. फायनलपूर्वी एका खेळाडूला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर हा सामना आयोजकांनी रद्द केला. त्यामूळे आता सामन्याशिवाय विजेता घोषित केला जाईल. पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत अरनॉड मर्केल आणि लुकास क्लेअरबॉट हे दोनच फ्रेंच खेळाडू आमनेसामने होते.(Olympic champion PV Sindhu in discussion again .., winning the competition for the second time …)