Old Car Problems : भारतात चारचाकी खरेदीदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु चारचाकी (Old Car Problems) देखभाल करण्यात भारतीय नागरिक फारसे जागरूक दिसत नाहीत त्यामुळे वाहनांमध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना त्यांना नेहमीच तोंड द्यावे लागते. तुम्हालाही तुमच्या जुन्या कारमध्ये (Car Care Tips) काही समस्या जाणवत असतील आणि त्या समस्या जर दुरुस्त होत नसतील तर नवीन कार खरेदी करणे शहाणपणाचे ठरेल. या कोणत्या समस्या आहेत ज्यामुळे तुम्हाला नवीन कार घेणे फायदेशीर ठरेल, हे आज आपण जाणून घेणार आहोत.
भारतात असे लोक मोठ्या संख्येने आहेत जे त्यांच्या कारचा दीर्घकाळ वापर करतात. पण जर कार जुनी झाली तर त्यात काही समस्या दिसू लागतात. या समस्या तात्काळ सोडवणे गरजेचे असते अन्यथा त्याची मोठी किंमत तुम्हाला चुकवावी लागू शकते. या बातमीत आज आम्ही तुम्हाला अशाच काही समस्यांची माहिती देणार आहोत.
Old Car Problems
इंजिन समस्या
तुमच्या कारच्या इंजिनमध्ये काही समस्या असल्यास त्या दुरुस्त करून घेणे गरजेचे ठरते. मात्र ही समस्या वारंवार उद्भवत असेल तर नवीन कार घेणेच फायदेशीर ठरेल. ज्यामुळे तुमच्या दुरुस्तीच्या खर्चात बचत होईल. जर इंजिनमध्ये दीर्घकाळ एकच समस्या निर्माण होत असेल तर त्यासाठी दुरुस्तीचा खर्च देखील वाढत जातो. त्यामुळे या समस्या सोडवण्याऐवजी नवीन कार घेणे फायद्याचे ठरेल.
Faulty Gear Box : कारचा गिअर बॉक्स खराब झाल्याचे कसे ओळखाल? ‘या’ गोष्टींकड दुर्लक्ष करू नका
एसी खराब
एसी युनिट देखील कारच्या इंजिनला जोडलेले असते. अनेक वेळा कारच्या एसीची कुलिंग सिस्टीम खराब होते त्यामुळे त्याची दुरुस्ती करणे अनेकदा कठीण होऊन बसते. जर तुमची कार खूप जुनी असेल आणि कारच्या एसीमध्ये काही समस्या निर्माण होत असतील तर कार एसी दुरुस्तीचा खर्च हजारो रुपयांपर्यंत जाऊ शकतो. अशा परिस्थितीत जर तुमची कार जुनी असेल तर कार बदलणे आणि पैसे बचत करणे शहाणपणाचे ठरेल.
Old Car Problems
इंधनाच्या वापरात वाढ
अनेकदा कार जुनी झाली की इंधनाचा जास्त वापर करते त्यामुळे इंधनावर होणाऱ्या खर्चात विनाकारण वाढ होते. जास्त इंधन वापराच्या समस्येचे निराकरण केले नाही तर अनेकदा खर्च वाढू शकतो. पण या समस्येवर कायमचा तोडगा म्हणून नवीन कार खरेदी करणे फायद्याचे ठरेल या गोष्टीचा तुम्ही नक्की विचार करू शकता.
ATM card : तुमच्याकडेही असेल एटीएम कार्ड तर तुम्हालाही घेता येईल 5 लाखांचा लाभ
इंटिरिअर खराब होणे
कार जसजशी जुनी होऊ लागते तसतसे कारच्या आतील इंटिरियर देखील खराब होऊ लागते. गिअर लिव्हर, डॅशबोर्ड, सीट आणि वाहनाच्या आतील भागात अनेक वेळा कचरा साचतो. काही वेळेस दुर्गंधीही येऊ लागते. बऱ्याच वाहनांचे इंटेरियर दुरुस्त करणे खूप खर्चिक बाब करते जर तुमची कार खूप जुनी झाली असेल आणि कारचे इंटिरियर देखील खराब झाले असेल तर नवीन कार खरेदी करू शकता.