Old Car Companies : जगातील कार कंपन्यांनी 100 वर्षांपूर्वी आपला व्यवसाय सुरू केला (Old Car Companies) होता. त्या वेळी कारचे मॉडेल आणि कारची मागणी देखील खूप कमी होती. हळूहळू वेळ निघून गेला आणि हा ताफा पुढे सरकत राहिला.
आजच्या परिस्थितीत, एखाद्या लहान मुलालाही विचारले तर तो सहज 5-10 कार ब्रँडची नावे सांगेल. या लेखात आम्ही तुम्हाला जगातील 10 जुन्या कार कंपन्यांबद्दल सांगणार आहोत. यातील काही कंपन्या अजूनही उंच भरारी घेत आहेत, तर काही कार कंपन्यांना बदलत्या काळानुसार त्यांचा व्यवसाय संपवावा लागला. त्या काळात कंपन्यांनी चारचाकी कार तयार केल्या.
आज या चारचाकी वाहनांचा प्रवास पाहताना वेगळ्याच गोष्टींची जाणीव होते. मात्र, त्या जुन्या कंपन्यांनी कार तयार केली म्हणून आज आपण कारमध्ये फिरत आहोत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. चला तर मग आज आपण यातील काही जुन्या कार निर्माता कंपन्यांची माहिती घेणार आहोत. यातील काही कंपन्या काळाच्या ओघात बंद पडल्या तर काही कंपन्या मात्र अजूनही भरारी घेत आहेत.
आज तर अनेक कार कंपन्या बाजारात आल्या आहेत. या कंपन्या एकापेक्षा एक सरस अशा कार तयार करतात. आता फक्त पेट्रोल, डिझेल आणि गॅसवरच नाही तर हायड्रोजनवर चालणाऱ्याही कार आल्या आहेत. इलेक्ट्रिक कारनाही मागणी वाढली आहे. इंधनाचे वाढलेले भाव परवडत नसल्याने लोक आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत.
त्यामुळे या चारचाकी कारना भारतीय बाजारपेठेत मागणी वाढली आहे. तसेच अन्य प्रकारच्या कारही रोजच बाजारात दाखल होत आहेत. याआधी आपण कधी स्वप्नातही विचार केला नसेल की अशा प्रकारच्या कारही कधीतरी रस्त्यावर धावताना दिसतील. मात्र, आज तेही घडले आहे.
Tatra
चेक कार उत्पादक Tatra ने 1850 मध्ये आपला व्यवसाय सुरू केला. कंपनी दुबई येथे आयोजित Dakar Rally Motorsport tournament मध्ये प्रभुत्व मिळविण्यासाठी ओळखली जाते. या कंपनीने सुरुवातीला बाजारात घोडागाडी आणली होती.
Peugeot
या कंपनीने 1882 मध्ये ऑटो मार्केटमध्ये प्रवेश केला. कंपनीने दुसऱ्या महायुद्धानंतर पहिली कार प्युजिओट 203 तयार केली. युनिबॉडी कारला व्ही-आकाराचे व्हॉल्व्ह आणि गोलाकार सिलिंडर हेड बसवले होते. हा सध्या आघाडीचा फ्रेंच कार ब्रँड आहे.
Mercedes-Benz
मर्सिडीज बेंझने 1883 मध्ये गॅस इंजिन उत्पादक म्हणून आपला प्रवास सुरू केला. Benz-Patent Motorwagen ने सुरू झाल्यानंतर 3 वर्षांनी वाहनांचे उत्पादन सुरू केले. या कार निर्मात्याने 1926 मध्ये आपली पहिली मर्सिडीज कार लाँच केली होती.
Renault
रेनॉल्टची स्थापना 1899 मध्ये लुईस, मार्सेल आणि फर्नांड रेनॉल्ट यांनी केली होती. त्यांनी त्यांचे पहिले उत्पादन Voiturette 1CV बाजारात आणले. रेनॉल्ट R5 टर्बोने जानेवारी 1980 मध्ये ब्रुसेल्स मोटर शोमध्ये लोकप्रिय स्पोर्ट्स हॅचबॅक म्हणून पदार्पण केले.
Fiat
फियाटची स्थापना 1899 मध्ये झाली. कंपनीने लॉन्चच्या वेळी अनेक मिनी कार बाजारात आणल्या. 2014 मध्ये, फियाटचे क्रिस्लर ऑटोमोबाइल्समध्ये विलीनीकरण झाले. काही काळ भारतात व्यवसाय केल्यानंतर कंपनी येथून निघून गेली.