Ola S1 X : पूर्ण चार्ज केल्यास देते 95 किमी रेंज, 75 हजारांपेक्षा स्वस्तात खरेदी करा ‘ही’ शानदार स्कुटर

Ola S1 X : तरुणांमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरची क्रेझ वाढत चालली आहे. कंपन्यादेखील मागणी जास्त असल्याने अनेक स्कुटर बाजारात लाँच करत आहेत. Ola ही भारतीय बाजारातील सर्वात आघाडीची कंपनी आहे. कंपनी सतत आपल्या शानदार फीचर्स आणि उत्तम मायलेज देणाऱ्या स्कुटर लाँच करत असते.

कंपनीची अशीच एक स्कुटर आहे जी 95 किमी रेंज देते. विशेष म्हणजे तुम्हाला ही स्कुटर 75 हजारांपेक्षा स्वस्तात खरेदी करता येईल. कंपनीकडून या शानदार स्कुटरमध्ये ॲलॉय व्हील आणि डिस्क ब्रेक यांसारखी प्रगत वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

मिळेल डिजिटल डिस्प्ले

किमतीचा विचार केला तर Ola S1 X या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 74999 रुपये इतकी आहे. यात इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स असे तीन राइडिंग मोड देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कंपनी आपले 7 रंग पर्याय आणि आरामदायी प्रवासासाठी सिंगल पीस सीट ऑफर करत असून शानदार स्कूटरला अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत.

OLA S1 X

OLA च्या स्कूटरमध्ये एलईडी हेडलाइट आहे, या स्कूटरमध्ये 34 लीटर अंडरसीट स्टोरेज देण्यात आले आहे. स्कूटरच्या सीटची उंची 805 मिमी आहे. ओला S1 त्याचे वजन कमी आहे, त्यामुळे कुटुंबातील कोणताही सदस्य रस्त्यावर सहज नियंत्रण करू शकतो. यात आरामदायी आणि मोठी पायांची जागा पाहायला मिळेल.

OLA S1 X ची स्मार्ट फीचर्स

  • 2700 डब्ल्यू पॉवर मोटर
  • 34 लिटर बूट स्पेस
  • 4 प्रकार आणि 7 रंग पर्याय
  • 5 इंच डिजिटल डिस्प्ले
  • 5 तासात पूर्ण चार्ज होते

Leave a Comment