Ola S1 X : 190 किमी रेंज आणि जबरदस्त फीचर्स! ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करता येईल Ola ची स्टायलिश स्कुटर

Ola S1 X : पेट्रोलच्या किमती वाढल्याने आता जवळपास सर्व कंपन्या इलेक्ट्रिक स्कुटर लाँच करत आहेत. सर्वच कंपन्या आपल्या स्कुटरमध्ये शानदार फीचर्स उपलब्ध करून देत आहेत. भारतीय बाजारात Ola च्या स्कुटर्सना चांगलीच मागणी आहे. कंपनीने आता आपली एक नवीन स्कुटर लाँच केली आहे. तुम्हाला यात शानदार फिचर मिळतील.

कंपनीने आपली Ola S1 X स्कुटर लाँच केलीय. ओला S1 ही कंपनीची हायस्पीड स्कूटर असून ज्यात अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर दिले आहेत. हे लक्षात घ्या की कंपनीची ही स्कूटर साध्या हँडलबार आणि एलईडी लाईटसह येते.

बॅटरी पॅक

कंपनीच्या नवीन ओला S1 या शक्तिशाली स्कूटरमध्ये 2 kWh, 3 kWh आणि 4 kWh चे तीन बॅटरी पॅक दिले आहेत. किमतीचा विचार केला तर या स्कूटरच्या 3 kWh वेरिएंटची किंमत 84,999 रुपये एक्स-शोरूम इतकी आहे तर 4 kWh ची किंमत 99,999 रुपये एक्स-शोरूम इतकी आहे.

मिळेल 85kmph चा टॉप स्पीड

विशेष म्हणजे ओलाची ही उत्तम स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 190 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. तर ही स्कूटर 85kmph चा टॉप स्पीड देईल. ओलाची ही नवीन स्कूटर 7.4 तासात पूर्ण चार्ज होते. यात फास्ट चार्जिंगचा पर्यायही उपलब्ध करून दिला आहे.

Ola S1 दमदार फीचर्स

  • या शानदार स्कूटरला मोठी हेडलाइट दिली आहे.
  • या स्कूटरमध्ये 34 लीटर अंडरसीट स्टोरेज देण्यात आले आहे.
  • स्कूटरमध्ये डिजिटल डिस्प्ले दिला आहे.
  • नवीन स्कुटरला टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि ड्युअल रिअर स्प्रिंग्स सस्पेंशन मिळेल.
  • 7 रंग पर्याय आणि रुंद आसन मिळेल.
  • स्कूटरच्या पुढील आणि मागील दोन्ही टायरवर ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत.

Leave a Comment