नवी दिल्ली : भारतीय बाजारात नुकत्याच दाखल झालेल्या ओला कंपनीच्या इलेक्ट्रीक स्कूटरला तुफान प्रतिसाद मिळत आहे. या कंपनीने फक्त दोन दिवसात तब्बल 1100 कोटींच्या स्कूटर विक्री केली आहे. 15 सप्टेंबरपासून स्कूटर विक्री सुरू झाली होती. त्यानंतर दोनच दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात स्कूटर विकल्या आहेत. ओला इलेक्ट्रीक स्कूटर ‘एस 1’ आणि ओला ‘एस 1 प्रो’ या दोन स्कूटरची विक्री करण्यात आली, असे कंपनीने सांगितले.
पहिल्या दिवशी सहाशे कोटींच्या स्कूटर विकल्या गेल्या. त्यानंतर आज शुक्रवारी सुद्धा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. देशातील ऑटोमोबाइल उद्योगामध्ये हा विक्री ऑर्डरचा आकडा हा एक दिवसाच्या विक्रीपेक्षा जास्त आहे, असा दावा कंपनीने केला आहे. आता 1 नोव्हेंबरपासून पुढील विक्री सुरू होणार आहे. बुकिंग रक्कम आणि प्रक्रियेत कोणताही बदल केलेला नाही. बुकिंग फक्त 499 रुपयांमध्ये करता येईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनीने दोन दिवसात 1100 कोटी रुपये विक्री केली आहे असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भावेश अग्रवाल यांनी सांगितले.
ओला एस 1 इलेक्ट्रीक स्कूटरची किंमत एक लाख रुपये आहे. तर एस प्रो या स्कूटरची किंमत 1.30 लाख रुपये आहे. ओला एस 1 स्कूटर एकदा चार्ज केल्यानंतर 120 किलोमीटर पर्यंत चालते. तर एस प्रो या स्कूटरची रेंज 180 किलोमीटरपर्यंत आहे. कंपनीने एक वर्षात 20 लाख स्कूटर तयार करण्याचे उद्दीष्ट निश्चित केले आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि लॅटिन अमेरिकेतील देशात या स्कूटर निर्यात केल्या जाणार आहेत, असे कंपनीने म्हटले आहे.
. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.