Ola Electric Bikes : ओलाची इलेक्ट्रिक बाइक खरेदी करण्याचा प्लॅन करताय? कधी होणार लॉन्च जाणून घ्या

Ola Electric Bikes : ओला इलेक्ट्रिक ही भारतीय बाजारातील सर्वात आघाडीची कंपनी आहे. जर तुम्ही कंपनीची इलेक्ट्रिक बाइक खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर बाईक कधी लॉन्च होणार हे जाणून घ्या.

कोठे मिळाली माहिती?

रिपोर्ट्सनुसार सांगायचे झाले तर ओला इलेक्ट्रिकने डीआरएचपीमध्ये ही माहिती दिली आहे. हा एक दस्तऐवज आहे जो कोणत्याही कंपनीला आयपीओ लाँच करण्यापूर्वी सेबीकडे जमा करणे गरजेचे असते. ज्यात कंपनी आपली इलेक्ट्रिक बाइक कधी लॉन्च करेल याची माहिती दिली आहे.

सेबीच्या माहितीनुसार, ओला आर्थिक वर्ष 2026 पर्यंत त्यांची डिलिव्हरी सुरू करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशा स्थितीत, कंपनी एप्रिल 2025 ते सप्टेंबर 2025 दरम्यान बाजारात आपल्या चारही इलेक्ट्रिक बाइक लॉन्च करू शकते.

ओलाकडून 15 ऑगस्ट 2023 रोजी त्यांच्या चार इलेक्ट्रिक बाइक्सचे प्रदर्शन करण्यात आले होते. डायमंडहेड, ॲडव्हेंचर, रोडस्टर आणि क्रूझर बाइक्स कंपनीने पहिल्यांदाच सादर करण्यात आल्या आहेत. या बाईक 2024 मध्येच लॉन्च होणार होत्या.

पण काही कारणांमुळे त्यांचे लॉन्च पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलल्या आहे. या बाइक्स कंपनीने अतिशय आकर्षक डिझाइन्स आणि शानदार फीचरसह सादर केल्या आहेत. तसेच उत्पादन आवृत्तीमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. पण कंपनी या बाइक्समध्ये अशा अनेक फीचर्स देण्याची शक्यता आहे. जे सध्याच्या इलेक्ट्रिक बाइक्समध्ये दिलेले नाहीत.

सर्वात मोठी इलेक्ट्रिक कंपनी

भारतीय बाजारात ओला इलेक्ट्रिक दर महिन्याला जास्तीत जास्त इलेक्ट्रिक स्कूटर विकते. मागील महिन्यात देखील या कंपनीने 37 हजारांहून अधिक इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री केली होती. असे झाल्याने इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांच्या यादीत तिचा समावेश झाला आहे.

Leave a Comment