मुंबई : मोदी सरकारनं पेट्रोल (Petrol) व डिझेलच्या (Diesel) दरावरील नियंत्रण हटवल्यानंतर ऑईल कंपन्यांकडून आता रोज इंधनाचे दर जाहीर केले जातात. रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली.. मात्र, त्याच वेळी देशातील पाच राज्यांच्या निवडणुका सुरु असल्याने तेल कंपन्यांनी इंधन दरवाढ रोखून धरली होती. निवडणुकांचा निकाल लागताच, तेल कंपन्यांनी राेज दरवाढीचा थोडा थोडा शॉक देण्यास सुरुवात केलीय. गेल्या 14 दिवसांत तब्बल 12 वेळा इंधन दरवाढ झाली.. आतापर्यंत 8 रुपये 40 पैशांनी डिझेल-पेट्रोलच्या किमती वाढल्यात. दुसरीकडे सर्वसामान्यांची अवस्था ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार..’ अशी झालीय.
सरकारी तेल कंपन्यांनी आजही (ता. 4) पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ केली.. आठवड्याच्या पहिल्या दिवशी (सोमवारी) देशातील सर्व प्रमुख शहरांतील इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. दिल्लीत पेट्रोल आणि डिझेल किमतीत लिटरमागे 40 पैशांची वाढ झाली. त्यामुळे देशाच्या राजधानीत आता पेट्रोल 103.81 रुपये प्रति लिटरवर गेले आहे. त्याच वेळी डिझेल 95 रुपये लिटरने विकले जात आहे..
प्रमुख शहरातील दर (प्रति लिटर)
- दिल्ली- पेट्रोल 103.81 रुपये, डिझेल 95.07 रुपये
- मुंबई- पेट्रोल 118.83 रुपये, डिझेल 103.07 रुपये
- चेन्नई- पेट्रोल 109.34 रुपये, डिझेल 99.42 रुपये
- कोलकाता- पेट्रोल 113.45 रुपये, डिझेल 98.22 रुपये
दरम्यान, रोजच्या इंधन दरवाढीमुळे ‘उबर’कडून पुण्यात प्रवासी भाड्यात 15 टक्क्यांची वाढ करण्यात आलीय. कंपनीने नुकतीच याबाबतची घोषणा केली. इंधनाचे दर सातत्याने वाढत असल्याने नाइलाजाने हा निर्णय घ्यावा लागल्याचे ‘उबर’ने स्पष्ट केलंय. इंधन दराच्या चढ-उतारावर कंपनीचे लक्ष आहे. त्यानुसार आगामी काळातही प्रवाशांसाठी आवश्यक ते निर्णय घेण्यात येतील, असेही कंपनीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले.
बाब्बो.. कोरोनाने चीनही हादरला..! ‘या’ शहरातील अडीच कोटी लोकांची होणार तपासणी सुरू; सैन्याची घेतलीय मदत..
‘त्या’ मुद्द्यावर विरोधक तोंडघशी..! पहा PM इम्रान खान यांच्या खेळीचा कसा बसलाय झटका