Discount on Skoda Car : कारप्रेमींसाठी सुवर्णसंधी! Skoda ने कमी केले ‘या’ कार्सचे दर, जबरदस्त मायलेजसह मिळेल 521 लीटर बूट स्पेस

Discount on Skoda Car : Skoda ने आपल्या दोन कार्सचे दर कमी केले आहेत. कंपनीकडून सेडान स्लाव्हिया आणि SUV Kushaq या गाड्यांवर 1 लाख रुपयांपर्यंत सवलत मिळत आहे. या कंपनीच्या सर्वात जास्त विक्री करणाऱ्या कार आहेत.

स्कोडा स्लाव्हिया

स्कोडा स्लाव्हिया ही कंपनीची फॅमिली सेडान कार असून ज्यात लांबच्या प्रवासासाठी 521 लीटरची मोठी बूट स्पेस दिली आहे. तर कंपनीच्या या कारला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंग मिळाले आहे.

मायलेज

कारमध्ये हिल होल्ड असिस्टचे फिचर दिले आहे. कंपनीची कार रस्त्यावर जास्तीत जास्त 19.47 kmpl चा मायलेज जनरेट करते. या उच्च दर्जाच्या लक्झरी कारमध्ये मागील पार्किंग सेन्सर, 10 इंच टचस्क्रीन डिस्प्ले आणि डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले सारखी फीचर्स आहेत.

फीचर्स

 • कंपनीच्या या कारमध्ये सिंगल पेन सनरूफ आहे, जे बाहेरचे उत्कृष्ट दृश्य देते.
 • कारमध्ये सहा एअरबॅग्ज आणि अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टिम मिळेल.
 • पॉवर्ड ड्रायव्हर सीट आहे.
 • कारमध्ये 1498 cc पेट्रोल इंजिन असून ते उच्च पिकअपसाठी 150 पीएस पॉवर जनरेट करते.
 • तर यात हाय स्पीडसाठी 6 आणि 7 स्पीड गिअरबॉक्स दिला आहे.

Skoda Kushaq

अलीकडेच कंपनीने आपल्या कारचे नवीन Onyx मॉडेल लॉन्च केले असून यात 1.0 लीटर पेट्रोल इंजिन आहे, ते 3 सिलेंडर इंजिन आहे. कारमध्ये टर्बो इंजिनचा पर्याय मिळेल. यात लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी 385 लीटरच्या बूट स्पेस मिळेल. कारला क्रूझ कंट्रोल आणि स्टायलिश 2 स्पोक स्टिअरिंग व्हील मिळेल.

फीचर्स

 • कारला 5 स्टार रेटिंग मिळाले आहे.
 • 5 सीटर कारमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे.
 • मागील सीटवर एसी व्हेंट आणि चाइल्ड सीट अँकरेजचे फीचर मिळाले आहे.
 • कार 115 PS पॉवर आणि 178 Nm टॉर्क जनरेट करते.
 • यात 6 स्पीड गिअरबॉक्स मिळतील.
 • यात पाच आकर्षक रंग पर्याय आणि सहा एअरबॅग्ज

Leave a Comment