Offer on iPhone । तुम्ही आता iPhone 13, iPhone 14 आणि iPhone 15 हे मॉडेल खूप स्वस्तात खरेदी करू शकता. तुम्हाला अमॅझॉनवर बंपर सवलत मिळत आहे, यामुळे तुमची हजारोंची बचत होऊ शकते.
आयफोन १५ ऑफर
नवीनतम आयफोन मॉडेलमध्ये डायनॅमिक आयलँड डिस्प्ले उपलब्ध असून शक्तिशाली प्रक्रियेसाठी A16 बायोनिक चिपसेट प्रदान केला आहे. मागील पॅनलवर, 48MP मुख्य कॅमेरा आणि 12MP दुय्यम कॅमेरा आणि 12MP सेल्फी कॅमेरासह ड्युअल कॅमेरा सेटअप मिळेल. तसेच SBI बँक Type-C चार्जिंगसह मॉडेल्सवर 4000 रुपयांची झटपट सवलत मिळेल. तर 70,999 रुपयांना उपलब्ध असलेल्या मॉडेलवर 55,900 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळेल
.
आयफोन 14 ऑफर
मागील वर्षी लॉन्च केलेल्या मॉडेलमध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना डिस्प्ले मिळेल. फोनमध्ये क्रॅश डिटेक्शन फीचर देखील पाहायला मिळेल. मागील पॅनलवर 12MP ड्युअल कॅमेरा प्रदान केला असून 12MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. पूर्ण चार्ज केल्यावर त्याची बॅटरी 20 तास सहज टिकते. किमतीचा विचार केला तर या मॉडेलची सुरुवातीची किंमत 62,800 रुपये आहे आणि ICICI बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 3000 रुपयांची सवलत मिळेल. यावर 55,900 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज डिस्काउंट मिळेल.
आयफोन 13 ऑफर
तुम्हाला हवे असेल तर तुम्ही 50 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत iPhone 13 खरेदी करू शकता. शक्तिशाली कामगिरीसाठी या फोनमध्ये मोठा 6.1 इंच डिस्प्ले, विशेष कॅमेरा वैशिष्ट्ये आणि Apple A15 बायोनिक प्रोसेसर आहे. यात 12MP ड्युअल कॅमेरा सेटअप मिळेल. हा फोन सध्या Amazon वर 49,300 रुपयांना लिस्ट केले गेले आहे आणि त्यावर 43,300 रुपयांपर्यंत कमाल एक्सचेंज सवलत मिळेल.