Offer on iPhone । जर तुम्ही नवीन iPhone खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी फ्लिपकार्टने एक शानदार सवलतआणली आहे. या सवलतीअंतर्गत तुम्हाला iPhone वर हजारोंची बचत करता येईल.
iPhone 13
किमतीबद्दल बोलायचे झाले तर आयफोन 13 128 जीबी मिडनाईट कलर व्हेरिएंट 51,999 रुपयांना खरेदी करता येईल. तुम्ही फोन खरेदी करण्यासाठी Flipkart UPI वापरले तर तुम्हाला 750 रुपयांची सवलत मिळेल. Flipkart Axis Bank कार्डद्वारे पैसे देणाऱ्या वापरकर्त्यांना 5% कॅशबॅक मिळेल.
फोनचा EMI 1829 रुपयांपासून सुरू होतो. हे लक्षात घ्या की एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन 41 हजार रुपयांपर्यंत स्वस्त मिळतोय. हा iPhone 6.1 इंच सुपर रेटिना XDR डिस्प्लेने सुसज्ज असून हे A15 बायोनिक चिपसेटवर काम करते. या फोनमध्ये 12 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि 12 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
iPhone 14
किमतीचा विचार केला तर 128 GB अंतर्गत स्टोरेजसह iPhone 14 चा ब्लू कलर व्हेरिएंट बिग बचत डेज सेलमध्ये 58,999 रुपयांना मिळेल. तर हा फोन खरेदी करण्यासाठी तुम्ही HDFC बँकेच्या कार्डद्वारे पैसे भरले तर तुम्हाला 5,000 रुपयांपर्यंत सवलत मिळेल.
या फोनचा EMI 2075 रुपयांपासून सुरू होतो. Flipkart Axis Bank कार्डधारकांना 5% कॅशबॅक मिळेल. या फोनमध्ये तुम्हाला 6.1 इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले पाहायला मिळेल. तर या फोनच्या मागील बाजूस 12-मेगापिक्सलचा डुअल कॅमेरा सेटअप दिला आहे. हा फोन A15 Bionic चिपसेटवर काम करतो.
iPhone 15
iPhone 15 चा 128 GB व्हेरिएंट सेलमध्ये 66,999 रुपयांना उपलब्ध असून UPI व्यवहारावर 1,000 रुपयांच्या सवलतीत हा फोन खरेदी करता येईल. कंपनी सेलमध्ये बँक ऑफरसह या फोनवर 1,000 रुपयांची सवलत मिळेल. तुम्ही iPhone 15 चा हा प्रकार 2356 रुपयांच्या सुरुवातीच्या EMI वर खरेदी करता येईल. या फोनमध्ये तुम्हाला फोटोग्राफीसाठी 48 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा मिळेल आणि हा शानदार फोन A16 Bionic चिपसेटवर काम करतो.