ODI World Cup Tickets : प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर गेल्या (ODI World Cup Tickets) महिन्यात भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. ही स्पर्धा ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. वेळापत्रक जाहीर झाले असले तरी तिकिटांच्या किंमती आणि विक्रीबाबत आयसीसीने मौन बाळगले आहे. दरम्यान, कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणाऱ्या या सामन्याच्या तिकिटांचे दर क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल अर्थात CAB ने जाहीर केले आहेत.
विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीसह एकूण ५ सामने ईडन गार्डन्सवर खेळवले जाणार आहेत. टीम इंडिया लीग स्टेजमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धही सामना खेळणार आहे. अशा परिस्थितीत स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी किती पैसे खर्च करावे लागतील हे जाणून घ्यायला चाहत्यांना नक्कीच आवडेल.
CAB चे अध्यक्ष स्नेहशिष गांगुली यांनी विश्वचषक सामन्यांचे तिकीट दर जाहीर केले. तिकिटाची कमीत कमी किंमत 100 आणि जास्तीत जास्त किंमत 3 हजार रुपये असेल. कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर एकूण पाच सामने खेळवले जाणार आहेत. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धही येथे महत्त्वाचा सामना खेळणार आहे. याशिवाय दुसरी उपांत्य फेरीही येथेच होणार आहे. या मैदानावर विश्वचषकाचा पहिला सामना 28 ऑक्टोबर रोजी क्वालिफायर-1 आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे.
पाकिस्तानचा सामना बांगलादेशशी होणार असून दुसऱ्या आणि चौथ्या सामन्यात इंग्लँडचा सामना कोलकातामध्ये होणार आहे. या सामन्याच्या तिकीट दर अप्पर टियरसाठी 800 रुपये, डी, एच ब्लॉकसाठी 1200 रुपये, सी, के ब्लॉकसाठी 2000 रुपये आणि बी, एल ब्लॉकसाठी 2200 रुपये असतील. या मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ५ नोव्हेंबरला विश्वचषकाचा तिसरा सामना खेळवला जाणार आहे. यानंतर दुसरा उपांत्य सामना १६ नोव्हेंबरला होणार आहे. या सामन्यांमध्ये अप्पर टियरसाठी 900 रुपये, डी, एच ब्लॉकसाठी 1500 रुपये, सी, के ब्लॉकसाठी 2500 रुपये आणि बी, एल ब्लॉकमध्ये बसण्यासाठी 2500 रुपये पेक्षा जास्त असेल.