Electric bike : शानदार ऑफर! 40 हजारांनी स्वस्तात खरेदी करा ‘ही’ 187 किमी रेंज देणारी बाईक

Electric bike : भारतीय बाजारात दिवसेंदिवस इलेक्ट्रिक बाईकची मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे कंपन्या देखील बाजारात इलेक्ट्रिक बाईक लाँच करू लागल्या आहेत. एक अशी बाईक आहे जी फुल चार्ज झाल्यावर 187 किलोमीटर रेंज देते.

ओबेन इलेक्ट्रिक

ओबेन इलेक्ट्रिकने पहिल्या 100 ग्राहकांना या ऑफरचा लाभ दिला असून या बाइकसाठी आतापर्यंत 21,000 बुकिंग मिळाले आहेत. मागील महिन्यात या बाईकचे फक्त 19 युनिट्स विकले गेले होते तर एप्रिलमध्ये फक्त 20 युनिट्स विकले गेले. जरी विक्रीचा वेग मंदावला असला तरी या ऑफरनंतर विक्री वाढू शकते, असा विश्वास कंपनीला आहे.

वैशिष्ट्ये

ओबेन रोर इलेक्ट्रिक बाईक कनेक्टिव्हिटी फीचरने परिपूर्ण आहे. बाईकची रचना अतिशय स्पोर्टी असून या बाइकची बॉडी ॲल्युमिनियम फ्रेमवर आधारित आहे. या बाईकचा परफॉर्मन्स कमी होत नाही आणि सुरळीत राइड मिळते.

तुम्ही तुमचा स्मार्टफोन मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे या बाईकशी जोडता येईल, त्यानंतर तुम्हाला मेंटेनन्स अपडेट्स, चार्जिंग स्टेशन लोकेटर, राइड डिटेल्स, बॅटरी स्टेटस, ऑन-डिमांड सेवा आणि रस्त्याच्या कडेला सहाय्य यांसारखी फीचर्स मिळतील. ही सर्व फीचर्स दैनंदिन वापरासाठी जास्त चांगली सिद्ध होऊ शकते. ग्राहकांच्या सुविधेसाठी या बाईकच्या बॅटरीला 3 वर्षे किंवा 50,000 किलोमीटरची वॉरंटी मिळत असून बाईकच्या मोटरवर 3 वर्षांची वॉरंटी देण्यात येत आहे आणि 3 सेवाही मोफत मिळत आहेत.

बॅटरी

ओबेन रोरला IP67 रेटिंगसह 4.4 kWh बॅटरी प्रदान केली असून बाईक 2 तासात 80% चार्ज होते. बाईक पूर्ण चार्ज केल्यावर ही बाईक 187 किलोमीटरची रेंज देते. यात इको, सिटी आणि हॅवॉक मोड उपलब्ध आहेत.

Leave a Comment