Pune : ‘काँग्रेसने (Congress) कधीही ओबीसींच्या हिताचा विचार केला नाही. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू (Pandit Jawaharlal Nehru), इंदिरा गांधी (Indira Gandhi), राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांनी नेहमी आरक्षणाला (OBC Reservation) विरोध केला. काँग्रेसने ‘मंडल आयोगाला’ (Mandal Commission) विरोध केला. त्यामुळे ओबीसी समाजाला स्वातंत्र्यापासून व काँग्रेसच्या काळात कधीही न्याय मिळाला नाही,’ अशी टीका भाजप ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार डॉ. के. लक्ष्मण (BJP OBC morcha national president and MP dr. K Lakshman) यांनी केली.
- Pune News : सामान्य नागरिकांना मिळणार हक्काचे घर
- ICC World Cup 2023 : .. तर BCCI तब्बल 950 कोटी गमावणार; पहा, मोदी सरकारमुळे कसा बसणार फटका
- NATO Russia Nuclear Exercises : रशियाच्या ‘त्या’ धमकीनंतर NATO सतर्क; अमेरिकेनेही दिला ‘हा’ गंभीर इशारा
- Share Market Closing Bell News: शेअर बाजारात घसरण सुरूच ; सेन्सेक्स ३९० अंकांनी घसरला तर निफ्टीही १७००० च्या जवळ बंद
वानवडीतील (Wanawadi) महात्मा फुले (Mahatma Phule) सांस्कृतिक भवन (Cultural Hall) येथे भारतीय जनता पक्षाच्या (BJP) वतीने ‘ओबीसी मोर्चा जागर संमेलना’चे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खासदार संगमलाल गुप्ता (MP Sangam Lalgupta), आमदार सुनील कांबळे (Sunil Kamble), भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik), संजय गाते (Sanjay Gaate), संजय केणेकर (Sanjay Kenekar), शंकरराव वाघ (Shankarrao Wagh), बापूसाहेब घडामोडे (Bapusaheb Ghadamode), माजी नगरसेविका रंजना टिळेकर (Ranjana Tilekar), महेश पुंडे (Magesh Punde) यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) व ओबीसी शहराध्यक्ष योगेश पिंगळे (Yogesh Pingale) यांनी केले होते.
टिळेकर म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) सर्वांत जास्त जवळ ओबीसी समाज (OBC Community) होता. साक्षात पांडुरंगाने भेदभाव केला नाही. १९५० पासून आम्ही आरक्षण मागत होतो; पण काँग्रेसने कधी आरक्षण मिळू दिले नाही. भाजपच्या वतीनेच आम्हाला न्याय मिळाला आहे. शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारमुळे गेलेले आरक्षण परत मिळाले. आता शिंदे-फडणवीस सरकार ओबीसी समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी काम करतील, अशी आम्हाला खात्री असल्याचेही ते म्हणाले.