NSC : लखपती होण्याची संधी! ‘या’ योजनेत मिळतोय FD पेक्षा जास्त परतावा, त्वरित करा गुंतवणूक

NSC : सरकारने सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. ज्याचा त्यांना खूप फायदा होत आहेत. देशातील कोट्यवधी लोक या सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत. अशीच एक योजना आहे ज्यात गुंतवणूक करून तुम्ही लाखो रुपयांची कमाई करू शकता.

काय आहे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना?

अनेकजण राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र म्हणजेच NSC मध्ये गुंतवणूक करत असतात. हे लक्षात घ्या की ही सरकारी योजना आहे. तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून या योजनेचा लाभ घेता येईल. ही कमी जोखमीची योजना असून या योजनेत 5 वर्षांचा लॉक-इन कालावधी इतका आहे.

म्हणजेच राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र या योजनेत एकदा पैसे गुंतवले की, तुम्हाला ते 5 वर्षे काढता येत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 10 वर्षांवरील कोणत्याही भारतीय नागरिकाला या योजनेत गुंतवणूक करता येते.

मिळतो FD पेक्षा जास्त परतावा

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र या योजनेचा सर्वात मोठा फायदा हा आहे की योजना सध्या FD पेक्षा जास्त वार्षिक व्याज देत आहे. या योजनेत 7.7 टक्के दराने व्याज दिले जात आहे जे कोणत्याही बँकेच्या (ज्येष्ठ नागरिक वगळता) 5 वर्षांच्या एफडी व्याजदरापेक्षा सर्वात जास्त आहे. FD मधील व्याज दर 7.7 टक्क्यांपेक्षा कमी आहे. तुम्ही NSC मध्ये किमान रु 1000 सह गुंतवणूक सुरू करू शकता. हे लक्षात घ्या की यात कमाल मर्यादा नाही.

मिळेल कर सवलत

NSC मध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला आयकरात सवलत मिळू शकते. आयकराच्या कलम 80C अंतर्गत, तुम्ही वार्षिक 1.50 लाख रुपयांच्या कमाल कर सवलतीचा दावा करू शकता. 5 वर्षांची मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर जी काही रक्कम मिळेल ती पूर्णपणे TDS मुक्त आहे.

कोणाला करता येत नाही गुंतवणूक

  • खाजगी आणि सार्वजनिक मर्यादित कंपन्या
  • हिंदू अविभक्त कुटुंब
  • अनिवासी भारतीय

Leave a Comment