NPS Rules । सध्या अशा अनेक योजना आहेत, ज्यात गुंतवणूक करून जास्तीत जास्त लाभ मिळतो. अशीच एक योजना म्हणजे NPS. जर तुम्ही NPS मध्ये गुंतवणूक केली असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
निवेदनानुसार, ट्रस्टी बँकेकडून आत्तापर्यंत मिळालेल्या गुंतवणुकीचा दुसऱ्या दिवशी (T+1) निपटारा केला जात असून याचा अर्थ असा की एक दिवस आधी मिळालेले योगदान दुसऱ्या दिवशी गुंतवण्यात येतो. PFRDA ने सांगितले की, कोणत्याही सेटलमेंटच्या दिवशी सकाळी 9:30 पर्यंत मिळालेले योगदान त्याच दिवशी गुंतवणुकीसाठी आधीच विचारात घेण्यात आले होते. सकाळी 11 वाजेपर्यंत मिळालेली योगदानाची रक्कम देखील लागू NAV सह त्याच दिवशी गुंतवण्यात येईल.
पूर्वीपेक्षा मिळणार जास्त फायदे
निवेदनानुसार, पीएफआरडीएने ‘पॉइंट ऑफ प्रेझेन्स’ (पीओपी), नोडल ऑफिसेस आणि ई-एनपीएससाठी एनपीएस ट्रस्टना त्यांच्या एनपीएस ऑपरेशन्स सुधारित टाइमलाइनसह संरेखित करण्याचा सल्ला दिला असल्याने आता ग्राहकांना योग्य मार्गाने लाभ घेता येणार आहे. पूर्वी, जमा केलेले पैसे गुंतवण्यापूर्वी फक्त एक दिवसाचा फरक असायचा. कारण ते पुढील ट्रेडिंग दिवशी (T+1) गुंतवले गेले.
गुंतवणूक करणे होईल सोयीस्कर
हे लक्षात घ्या की आता नवीन नियमांनुसार ही प्रणाली गुंतवणूकदारांसाठी पूर्वीपेक्षा चांगली झाली असून आता सकाळी 11 वाजेपर्यंत जमा केलेले डि-रिमिट पैसेही त्याच दिवशी गुंतवण्यात येतील. तेही त्या दिवशी लागू होणाऱ्या नेट ॲसेट व्हॅल्यू (NAV) नुसार. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ने एनपीएसमध्ये लवकर फायदे मिळण्यासाठी काही बदल करण्यात आले आहेत. या बदलांनंतर, NPS मध्ये गुंतवणुकीची प्रक्रिया सुलभ आणि जलद होईल.
पेन्शन रेग्युलेटरने 2023-24 या वर्षात गैर-सरकारी क्षेत्रांमधून NPS मध्ये 9.47 लाख नवीन ग्राहक जोडले असल्याने NPS ची गुंतवणूक रक्कम 30.5% ने वाढली आहे. वार्षिक आधारावर ते 11.73 लाख कोटी रुपये इतके झाले. 31 मे 2024 पर्यंत NPS सदस्यांची एकूण संख्या 18 कोटी असून 20 जून 2024 पर्यंत, अटल पेन्शन योजना अंतर्गत एकूण नोंदणीने 6.62 कोटी ओलांडले आहेत, त्यापैकी 2023-24 मध्ये 1.2 कोटीहुन अधिक नोंदणी झाली होती.