NPS Rule । सावधान! NPS मधून पैसे काढण्याच्या नियमात झाले बदल, जाणून घ्या नवीन नियम

NPS Rule । NPS नवीन नियम पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणने या महिन्यात नॅशनल पेन्शन सिस्टमच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यामुळे पैसे काढण्यापूर्वी तुम्हाला हे नियम माहिती असावे लागतात.

आंशिक पैसे काढण्याचा नवीन नियम

पीएफआरडीएने आंशिक पैसे काढण्यासाठी नवीन नियमांबाबत अधिसूचना जारी करण्यात आली होती. अधिसूचनेनुसार, आता NPS खाते चालू केल्यानंतर 3 वर्षानंतरच पैसे काढता येतात. याशिवाय आता खातेधारक योगदान दिलेल्या रकमेच्या २५ टक्क्यांहून जास्त रक्कम काढता येत नाही. हा नियम 1 फेब्रुवारी 2024 पासून लागू झाला आहे.

समजा जर तुम्ही जानेवारी 2020 मध्ये एनपीएस खाते उघडले असल्यास तुम्ही 2024 मध्ये आंशिक पैसे काढू शकता. जर तुम्ही 1 लाख रुपयांचे योगदान दिले असेल तर तुम्हाला फक्त 25,000 रुपये काढता येतील.

कधी काढता येतात पैसे

  • घर खरेदी करण्यासाठी तुम्हाला NPS खात्यातून पैसे काढता येतात.
  • तुम्हाला मुलांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या लग्नासाठीही खात्यातून पैसे काढता येतात.
  • कोणत्याही वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीतही तुम्ही NPS मधून पैसे काढता येतात.
  • कौशल्य विकास खर्चासाठी तुम्ही खात्यातून पैसे काढता येतात.
  • नवीन व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करणार असाल तरीही तुम्ही खात्यातून पैसे काढता येतात.
  • अपघातामुळे खातेधारक अक्षम झाला असला तरीही तो NPS खात्यातून पैसे काढता येतात.

अटी

  • खाते 3 वर्षे जुने असावे लागते.
  • योगदान दिलेल्या रकमेपैकी फक्त एक चतुर्थांश रक्कम काढता येईल.
  • आंशिक पैसे काढणे केवळ 3 वेळा केले जाते.

असे काढा पैसे

  • NPS खात्यातून पैसे काढण्यासाठी, तुम्हाला पैसे काढण्याची विनंती सबमिट करावी लागणार आहे.
  • तुम्हाला पैसे काढण्याचे कारण द्यावे लागेल आणि त्यासंबंधीची कागदपत्रे सादर करावे लागेल.
  • पैसे काढण्याच्या विनंतीनंतर, सेंट्रल रेकॉर्डकीपिंग एजन्सी अर्जावर प्रक्रिया करते.
  • पैसे काढण्याची विनंती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, काही दिवसात पैसे खात्यात जमा होतात.

Leave a Comment