NPS Pension : ..तर तुम्हाला घरबसल्या मिळतील दरमहा 50 हजार रुपये, कसं ते जाणून घ्या

NPS Pension : सरकारच्या अशा अनेक योजना आहेत, ज्याद्वारे तुम्हाला आता तुम्ही घरी बसून दरमहा 50,000 रुपये सहज मिळवू शकता. काय आहे सरकारची ही योजना जाणून घ्या.

नॅशनल पेन्शन सिस्टम असे या योजनेचे नाव आहे. अनेकांना या योजनेची माहिती नसल्याने ते या योजनेत गुंतवणूक करत नाही. त्यामुळे ते योजनेच्या लाभापासून वंचित राहतात.

सेवानिवृत्तीच्या फायद्यांसाठी सर्वात लोकप्रिय सरकारी-समर्थित पेन्शन योजनांपैकी एक राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजेच NPS योजना आहे. हे लक्षात घ्या की ही योजना पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी द्वारे व्यवस्थापित केली जाते आणि पेन्शन सुविधेव्यतिरिक्त, ते कर लाभ प्रदान करते.

नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजे काय?

नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजेच NPS ही सर्व भारतीय नागरिकांसाठी उपलब्ध असलेली ऐच्छिक बचत योजना आहे. सरकारकडून 2004 मध्ये सुरू करण्यात आलेली ही योजना फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध होती. पण नंतर ते 18 ते 70 वर्षे वयोगटातील सर्व नागरिकांसाठी वाढविण्यात आले.

NPS मध्ये गुंतवलेली रक्कम सध्या 9 टक्के ते 12 टक्के दरम्यान वार्षिक परतावा देत असून तुम्हाला आयकर कायदा, 1961 च्या कलम 80 CCD(1) आणि 80 CCD 1(B) अंतर्गत वार्षिक 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर लाभांचा दावा करता येतो.

दरमहा मिळणार 50 हजार रुपये पेन्शन

NPS कॅल्क्युलेटरनुसार, जर एखाद्या व्यक्तीने 25 ते 60 वर्षे वयापर्यंत NPS मध्ये प्रत्येक महिन्याला 6,531 रुपये योगदान दिले तर त्याला 60 वर्षांनंतर प्रत्येक महिन्याला 50,005 रुपये पेन्शन म्हणून मिळतील. समजा 60 वर्षापर्यंत, एखादी व्यक्ती 27,43,020 रुपयांपर्यंत गुंतवणूक करेल आणि त्याचा निधी 2,50,02,476 रुपयांपर्यंत जमा होईल. यात व्यक्तीला 2,22,59,456 रुपयांचा सहज फायदा मिळेल.

Leave a Comment