NPS Account : सरकारच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यात नागरिकांना चांगला परतावा मिळतो. सरकारची महिलांसाठी अशीच एक खास योजना आहे, या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 45 हजारांची पेन्शन मिळत आहे. काय आहे योजना? जाणून घेऊयात.
तुम्हाला तुमच्या पत्नीच्या नावावर नवीन पेन्शन प्रणाली खाते चालू करता येईल. सोयीनुसार, दरमहा किंवा वार्षिक पैसे जमा करण्याचा पर्याय असून NPS खाते पत्नीच्या नावाने 1,000 रुपयांनीही चालू करता येते. हे लक्षात घ्या की NPS खाते वयाच्या ६० व्या वर्षी परिपक्व होते. नवीन नियमांनुसार, तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पत्नीचे वय 65 वर्षे होईपर्यंत NPS खाते चालू ठेवू शकता.
असा तयार होईल 1.14 कोटीचा निधी
उदाहरणासह समजून घ्या- तुमची पत्नी 30 वर्षांची आहे आणि तुम्ही तिच्या NPS खात्यात दरमहा 5000 रुपयांची गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला गुंतवणुकीवर 10 टक्के वार्षिक परतावा मिळेल. तर वयाच्या 60 व्या वर्षी त्याच्या खात्यात एकूण 1.12 कोटी रुपये असतील. यातून त्यांना अंदाजे ४५ लाख रुपये मिळतील. दरमहा सुमारे 45,000 रुपये पेन्शन मिळू शकेल. हे लक्षात घ्या की पेन्शन आयुष्यभर मिळत राहील.
किती मिळेल पेन्शन?
वय- 30 वर्षे
एकूण गुंतवणुकीचा कालावधी – 30 वर्षे
मासिक योगदान- रु 5,000
गुंतवणुकीवर अंदाजे परतावा – 10 टक्के
एकूण पेन्शन फंड- मॅच्युरिटीवर रु. 1,11,98,471 काढता येतील.
ॲन्युइटी प्लॅन खरेदी करण्याची रक्कम 44,79,388 रुपये इतकी आहे.
रु. 67,19,083 अंदाजे वार्षिकी दर 8 टक्के
मासिक पेन्शन- 44,793 रुपये.
हे लक्षात घ्या की NPS ही केंद्र सरकारची सामाजिक सुरक्षा योजना असून तुम्ही या योजनेत गुंतवलेले पैसे व्यावसायिक फंड व्यवस्थापकांद्वारे व्यवस्थापित केले जातात. केंद्र सरकार या व्यावसायिक निधी व्यवस्थापकांना ही जबाबदारी देते. तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित राहते. योजनेत गुंतवलेल्या पैशावर परतावा मिळण्याची हमी नसते. वित्तीय नियोजकांच्या मतानुसार, NPS ने सुरुवातीपासून सरासरी 10 ते 11 टक्के वार्षिक परतावा दिला आहे.