NPS Account । सध्या अशा अनेक योजना आहेत, ज्यात तुम्ही गुंतवणूक करून जबरदस्त परतावा मिळवू शकता. इतकेच नाही तर तुम्हाला यावर कोणताही कर भरावा लागणार नाही. अनेकदा अनेकांचे NPS खाते गोठवले जाते. पण तुम्ही ते सोप्या पद्धतीने सक्रिय करू शकता.
सध्या गुंतवणुकीसाठी अनेक योजना आहेत. यापैकी NPS ही एक खास योजना आहे. यात खातेदाराला परताव्याचा लाभ मिळतो. याशिवाय मुदतपूर्तीनंतर पेन्शनची सुविधाही उपलब्ध असून गुंतवणूकदार 60 वर्षांचा होतो त्यावेळी तो NPS मध्ये गुंतवलेल्या एकूण रकमेपैकी 60 टक्के रक्कम काढू शकतो.
तर 40 टक्के वार्षिकी म्हणून वापरले जातात. अशाप्रकारे NPS मोठ्या निधीसह वृद्धापकाळ निवृत्ती वेतनाची व्यवस्था करते. समजा जर गुंतवणूकदाराने संपूर्ण आर्थिक वर्षात NPS खात्यात किमान रक्कम जमा केली नाही, तर त्याचे खाते गोठवण्यात येते. गुंतवणूकदाराने एका आर्थिक वर्षात किमान 500 रुपये गुंतवणे गरजेचे आहे. तुम्ही आता फ्रीझ किंवा निष्क्रिय खाते पुन्हा सक्रिय करू शकता.
असे करा NPS खाते सक्रिय
- गोठलेले खाते पुन्हा सक्रिय करण्यासाठी, तुम्हाला UOS-S10-A फॉर्म भरावा लागणार आहे. हा फॉर्म तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये मिळेल. तुम्ही ज्या बँकेत तुमचे NPS खाते उघडले आहे तिथूनही हा फॉर्म मिळेल. तुम्ही ऑनलाइन फॉर्म डाउनलोड करू शकता.
- फॉर्म भरल्यानंतर ग्राहकाला PRAN कार्डची प्रत जोडा.
- खातेदाराला वार्षिक थकबाकी जमा करावी करून वर्षाला १०० रुपये दंड भरावा लागेल.
- अर्ज भरल्यानंतर त्याची पडताळणी अधिकाऱ्याकडून करण्यात येईल.
- अर्जाची पडताळणी झाल्यानंतर, प्रक्रिया सुरू केली जाईल आणि PRAN सक्रिय करण्यात येईल.
असे करा वेबसाइटवरून खाते सक्रिय
- तुम्हाला सर्वात अगोदर NPS वेबसाइटवर जावे लागेल (https://www.indiapost.gov.in/Financial/pages/content/nps.aspx).
- PRAN नंबर आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करा.
- आता My account वर क्लिक करा.
- पुढे Unfreeze account चा पर्याय निवडा.
- आता तुम्हाला सर्व आवश्यक माहिती भरून विलंब शुल्क भरावे लागेल.
- पेमेंट केल्यानंतर तुमचे खाते सक्रिय होईल.