दिल्ली – कर्नाटकातील (Karnataka) मंगळुरू (Mangalore) येथील राम मंदिराच्या धर्तीवर विश्व हिंदू परिषदेच्या (VHP) नेत्याने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मंगळवारी रात्रीपासून जुमा मशिदीच्या 500 मीटरच्या आत असलेल्या मोठ्या मेळाव्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, नेत्याने दावा केला आहे की, मशिदीच्या खालची रचना मंदिरासारखी आहे. 21 एप्रिलपासून मशिदीच्या दुरुस्तीच्या कामात हे आढळून आल्याचा दावा या नेत्याने केला आहे.
विहिंप नेत्याच्या धमकीनंतर राज्य सरकारच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने मंगळवारी रात्री आठ ते सकाळी आठ वाजेपर्यंत कलम 144 लागू केले आहे. नेत्याचा दावा आहे की गेल्या महिन्यात मंगळुरूच्या मलाली भागातील जुमा मशिदीच्या नूतनीकरणाच्या कामात अधिकाऱ्यांना मशिदीच्या खाली मंदिरासारखी रचना आढळली.
विहिंपने रविवारी आयोजित केलेल्या बैठकीत 26 मे पूर्वी गावात ‘थांबूला प्राशन’ सोहळा आयोजित केला जाईल, त्यानंतर हिंदू देवतांची उपस्थिती तपासण्यासाठी ‘अष्टमंगला प्राशन’ होईल, असा निर्णय घेण्यात आला.
ANI नुसार, बुधवारी VHP आणि बजरंग दलाने मलाली येथील श्री रामांजनेय भजन मंदिरात ‘तांबूला प्राशन’चा शांततापूर्ण विधी केला. या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मंगळुरूचे पोलिस आयुक्त एनएस कुमार म्हणाले की, दोन्ही बाजूंनी न्यायालयात हे प्रकरण लढवण्याचा निर्णय घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात येईल अशी आशा आहे.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
विहिंप नेत्याच्या म्हणण्यानुसार, “येथील सर्व हिंदूंचा ठाम विश्वास आहे की हे मंदिर नक्कीच होते. या सर्व विधीनंतर आम्ही ती जागा परत मिळवण्यासाठी एक समिती स्थापन करू. हा लढा राम मंदिर मोहिमेप्रमाणे लढला जाईल.” त्याचवेळी, स्थानिक भाजपचे आमदार भरत शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पुरातत्व विभागाने सत्य शोधण्यासाठी मशिदीचे सर्वेक्षण करावे.