Aadhaar Card : आज आपल्या देशात आधार कार्ड हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज बनला आहे. सरकारी किंवा निम्म सरकारी काम आज आधार कार्डाशिवाय होऊ शकत नाही. बँक खाते उघडणे,मुलाला शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी आज आधार कार्ड आवश्यक आहे.
त्यामुळे आधार कार्डमधील महत्त्वाची माहिती अपडेट ठेवणे गरजेचे आहे. जसे की मोबाईल नंबर. आधारमध्ये मोबाईल क्रमांक अपडेट केल्यास अनेक गोष्टी करता येतील. अशा परिस्थितीत, जर तुमच्या आधारमध्ये जुना नंबर असेल किंवा तुम्ही नवीन नंबर घेतला असेल, तर लगेच नवीन क्रमांक अपडेट करा.
आधारमध्ये ऑनलाईन मोबाईल नंबर कसा बदलायचा?
यासाठी, सर्वप्रथम UIDAI वेबसाइटला भेट द्या आणि तुमचा तपशील प्रविष्ट करा आणि ‘Send OTP’ बटणावर क्लिक करा.
जर नंबर जुना नसेल तर कॅप्चा आणि नवीन मोबाईल नंबर टाका आणि ‘Send OTP’ वर क्लिक करा. आता OTP आणि इतर माहिती टाका.
मोबाईल नंबर अपडेट केल्यानंतर चेकबॉक्सवर क्लिक करा आणि सबमिट करा.
आता तुमचा मोबाईल नंबर पुन्हा एंटर करा आणि सबमिट अपडेट रिक्वेस्ट वर क्लिक करा.
यानंतर मोबाईल नंबर व्हेरिफाय करा आणि कन्फर्म करा.
आधार कार्ड ऑफलाइनमध्ये मोबाईल नंबर कसा बदलायचा?
जर तुमचा मोबाईल नंबर बदलला असेल तर तुम्ही तो UIDAI डेटाबेसमध्ये अपडेट करू शकता. यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला जवळच्या आधार नोंदणी केंद्रात जावे लागेल. तुमचा आधार क्रमांक अपडेट करण्यासाठी, फॉर्म भरा आणि सबमिट करा. फी देखील भरा.
हे काम करण्यासाठी तुम्हाला 50 रुपये फी भरावी लागेल. जर तुम्हाला बायोमेट्रिक माहिती अपडेट करायची असेल तर तुम्हाला 100 रुपये शुल्क भरावे लागेल. जर तुम्हाला बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक दोन्ही डेटा अपडेट करायचा असेल तर तुम्हाला 100 रुपये शुल्क भरावे लागेल.
हे जाणुन घ्या की तुमची नवीन माहिती अपडेट होण्यासाठी 1 महिना लागू शकतो.